Year Ender 2021 | ‘अन्नाथे’पासून ते ‘मास्टरपर्यंत, साऊथच्या ‘या’ चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर कल्ला!

या वर्षी साऊथच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

Dec 31, 2021 | 11:08 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 31, 2021 | 11:08 AM

'जय भीम' हा तमिळनाडूच्या आदिवासी समाजावर बनलेला चित्रपट आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2021 रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे बजेट 10 कोटींहून अधिक होते आणि साऊथचा सुपरस्टार सूर्याने या चित्रपटात न्यायमूर्ती चंद्रूची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाने खर्चापेक्षा कितीतरी पटीने अधिक कमाई केली.

1 / 5
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा 'अन्नाथे' हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटाने 250 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटासाठी रजनीकांतने निर्मात्यांकडून केवळ 50 टक्के फी घेतली होती. 'अन्नाथे'मध्ये भाऊ-बहिणीचे नाते दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात रजनीकांतशिवाय क्रिती सुरेश मुख्य भूमिकेत होती.

2 / 5
‘मास्टर’ हा एक क्राइम ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये सुपरस्टार विजयसेतुपती मुख्य भूमिकेत आहे. विजय सेतुपती एका मद्यपी प्राध्यापकाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 135 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

3 / 5
अभिनेता पवन कल्याणने राजकारणात आल्यानंतर चित्रपट सोडले होते आणि पुन्हा एकदा ‘वकील साब’मधून तो पडद्यावर परतला होता. ‘वकील साब’ हा ‘पिंक’ चित्रपटाचा रिमेक आहे. पवन कल्याणच्या अभिनयाने पुन्हा एकदा लोकांना थिएटरमध्ये खेचून आणले. या चित्रपटाने 90 कोटींची कमाई केली होती.

4 / 5
‘लव्ह स्टोरी’ हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये नागा चैतन्य आणि साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात साधी प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर 50 कोटींहून अधिक कमाई केली.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें