AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yo Yo Honey Singhच्या पत्नीने मागितली 10 कोटींची भरपाई, दाखल केलीय कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार!

बॉलिवूडचे प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंह (Yo Yo Honey Singh) यांची पत्नी शालिनी तलवार यांनी त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता हे प्रकरण आणखी पुढे गेलं आहे.

Yo Yo Honey Singhच्या पत्नीने मागितली 10 कोटींची भरपाई, दाखल केलीय कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार!
हानी सिंह
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 12:09 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंह (Yo Yo Honey Singh) यांची पत्नी शालिनी तलवार यांनी त्याच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता हे प्रकरण आणखी पुढे गेलं आहे. अशा परिस्थितीत, आता कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत हनी सिंहची पत्नी शालिनीने रॅपरकडून 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. रॅपरच्या पत्नीचे म्हणणे आहे की, तिला प्राण्यासारखे वागवले गेले आहे. ज्यामुळे त्याने हे मोठे पाऊल उचलले आहे.

शालिनीने तिचे संपूर्ण प्रकरण तीस हजारी न्यायालयाच्या मुख्य महानगर दंडाधिकारी तानिया सिंह यांच्यासमोर दाखल केले आहे, जिथे हनी सिंहला या प्रकरणी 28 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करावे लागेल.

10 वर्षांपासून सहन केला अत्याचार

झी न्यूजच्या बातमीनुसार, मुख्य महानगर दंडाधिकारी तानिया सिंह यांनी नोटीस जारी केली आहे की, हनी सिंहने पती-पत्नीमध्ये असलेल्या कोणत्याही मालमत्तेमध्ये कोणत्याही पक्षाला जोडू नये, त्याच्या पत्नीचे सर्व दागिने तिला देण्यात यावेत. हनी सिंहची पत्नी सांगते की, त्याला गेल्या 10 वर्षांपासून तिला घरात वाईट रीतीने वागवले जात होते. जिथे त्यांच्यावर शारीरिक, शाब्दिक, मानसिक आणि भावनिक अत्याचार झाले आहेत.

आपला मुद्दा सर्वांसमोर ठेवून, शालिनीने सांगितले की, हनी सिंहने त्यांच्या लग्नाला महत्त्व दिले नाही, त्याने त्याच्या लग्नाची अंगठीही घातली नव्हती. एकदा जेव्हा शालिनीने तिचे आणि तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यानंतरही तो खूप रागावला आणि त्याने शालिनीला खूप मारले. शालिनी सांगते की हनीचेही अनेक अफेअर्स होते, जिथे त्याने “ब्राऊन रंग साँग”च्या शूटिंग दरम्यानही त्याच्याच टीममधील एका मुलीसोबत सेक्स केला होता.

शालिनीच्या मागण्या

शालिनीने कोर्टातही अपील केले आहे की, हनीला दर महिन्याला दिल्लीतील एका आलिशान फ्लॅटच्या भाड्यासाठी 5 लाख रुपये द्यावे लागेल. कारण, तिला स्वतःच्या आईबरोबर राहायचे नाही. हनी सिंहने 23 जानेवारी 2011 रोजी शालिनी तलवारसोबत लग्न केले. रॅपरची त्याची पत्नी त्याच्या कारकिर्दीत अडथळा आणू इच्छित नाही. त्याचबरोबर काही मीडिया रिपोर्ट्स असेही सांगत आहेत की, हनी सिंह मूल न झाल्याने डिप्रेशनमध्ये होता. यामुळे त्याने बॉलिवूडपासून अंतर राखले होते. मीडिया रिपोर्टनुसार, हनी सिंहला बायपोलर डिसऑर्डर होता. या प्रकरणात पुढे काय होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

(Yo Yo Honey Singh’s wife seeks Rs 10 crore compensation, files domestic violence complaint)

संबंधित बातम्या :

यो यो हनी सिंह आणि वादांचं जुनं कनेक्शन, पाहा आतापर्यंत कोणकोणत्या वादात अडकलाय गायक!

Yo Yo Honey Singh पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, पत्नीने दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.