प्रेग्नेंट श्रीदेवी यांच्या पोटात बुक्का…! घर तोडणारी बाई म्हणून टोमणे… अत्यंत खडतर होतं अभिनेत्रीचं खासगी आयुष्य

प्रेग्नेंट श्रीदेवी यांच्या पोटात जोरात बुक्का...! दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करणारी बाई म्हणून सतत टोमणे.... अत्यंत खडतर होतं 'बॉलिवूडच्या चांदनी'चं खासगी आयुष्य..., पण कोणी केलेला धक्कादायक खुलासा...

प्रेग्नेंट श्रीदेवी यांच्या पोटात बुक्का...!  घर तोडणारी बाई म्हणून टोमणे... अत्यंत खडतर होतं अभिनेत्रीचं खासगी आयुष्य
अभिनेत्री श्रीदेवी
| Updated on: Mar 16, 2026 | 3:29 PM

हिंदी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना कधीच विसरलं जाऊ शकत नाही. प्रोफेशनल आयुष्यात श्रीदेवी यशाच्या उच्च शिखरावर होत्या. पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रीने अनेक चढ-उतार पाहिले. मोठ्या पडद्यावर श्रीदेवी यांचं आयुष्या जेवढं चमकत होतं, त्यापेक्षा खडतर अभिनेत्रीचं खासगी आयुष्य होतं… कारण श्रीदेवी यांनी दोन मुलांचे वडील आणि मैत्रिणीच्या नवऱ्यासोबतच लग्न केलं… फिल्ममेकर बोनी कपूर त्यांची पत्नी मोना शौरी यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत होते. पण श्रीदेवी यांची त्यांच्या आयुष्यात एन्ट्री झाली आणि घरात मोठं वादळ आलं…

बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासोबत लग्न करायचं होतं. पण लग्नासाठी श्रीदेवी तयार नव्हत्या. एवढंच नाही तर, बोनी कपूर त्यांच्या पहिल्या पत्नीपासून काहीच लपवत नव्हते. म्हणून त्यांनी मोना यांनी श्रीदेवी यांच्याबद्दल सर्वकाही सांगितलं आणि मोना यांच्या खासगी आयुष्यात मोठा भुकंप आला… अशात 1996 मध्ये श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी लग्न केलं, लग्नानंतर बोनी कपूर आणि श्रीदेवी त्यांच्या मुलींसोबत वेगळे राहू लागले…

दरम्यान, प्रसिद्ध चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्या व्हायरल पत्राबद्दल मोठं सत्य समोर आलं. सोशल मीडियावर ‘माय लेटर टू श्रीदेवी’ या नावाने पत्र लिहिलं होतं. पत्रात राम गोपाल वर्मा यांनी श्रीदेवी यांचे त्यांच्या सासूबद्दल असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केलेला… बोनी कपूर यांच्या आईला श्रीदेवी बिलकूल आवडत नव्हत्या… श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचं नातं काही निवडक लोकांनी स्वीकारलं होतं, हे नाकारता येणार नाही. समाजात त्यांना अनेकदा “घर तोडणारी” असं संबोधलं जायचं…

वर्मा यांनी पत्रात लिहिल्यानुसार, श्रीदेवी संपूर्ण आयुष्या दुःखी हित्या, भविष्याबद्दल कायम त्यांना चिंता सतावत होती… खासगी आयुष्यातील घटनांमुळे त्यांच्या डोक्यावर वाईट परिणाम झालेला… ज्यातून त्या आयुष्यभर सावरू शकल्या नाहीत… असं देखील म्हटलं जातं की, जेव्हा श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या नात्याबद्दल त्यांच्या आईला कळलं तेव्हा त्या प्रचंड भडकल्या…
एका हॉटेलमध्ये जेव्हा श्रीदेवी यांचा सामना सासूसोबत झाला तेव्हा बोनी कपूर यांच्या आईने अभिनेत्रीला खूप काही सुनावलं,,, एवढंच नाहीतर, प्रेग्नेंट श्रीदेवी यांच्या पोटावर बुक्का देखील मारला… असं देखील सांगण्यात येतं…

अर्जुन कपूर याचं पत्र पाहून भावूक झालेले बोनी कपूर

श्रीदेवी यांच्यासोबत दुसरा संसार थाटल्यानंतर अर्जुन कपूर याने वडिलांना पत्र लिहिलं होतं. ‘बाबा तुम्ही घरी का येत नाही…?’ असं पत्रात लिहिलं होतं. पत्र वाचल्यानंतर बोनी कपूर यांना प्रचंड दुःख झालं. कारण बोनी कपूर त्यांच्या मुलांवर प्रचंड प्रेम करतात. पण कुटुंबात भांडणं नको म्हणून त्यांनी श्रीदेवी यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.

Follow Us