AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs KKR Live Streaming : केकेआरसमोर हैदराबादचं आव्हान, ऑरेंज आर्मीला रोखणार?

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders IPL 2026 Live Scorecard : रविवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे.

SRH vs KKR Live Streaming : केकेआरसमोर हैदराबादचं आव्हान, ऑरेंज आर्मीला रोखणार?
SRH vs KKR Live StreamingImage Credit source: Bcci
| Updated on: May 03, 2026 | 6:22 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात रविवारी 3 मे रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. हैदराबादचा हा दहावा सामना असणार आहे. तर केकेआरचा नववा सामना असणार आहे. केकेआरची या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. त्यामुळे आता कोलकाता हैदराबादला पराभूत करुन एकूण सातव्या विजयापासून रोखणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अजिंक्य रहाणे याच्याकडे केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर पॅट कमिन्स हैदराबादचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कधी?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रविवारी 3 मे रोजी होणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना कुठे?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना राजीव गांधी स्टेडियम, हैदराबादमध्ये होणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होणार आहे.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

केकेआर पलटवार करणार?

कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील हा 19 व्या मोसमातील दुसरा सामना असणार आहे. याआधी दोन्ही संघ 2 एप्रिलला भिडले होते. तेव्हा हैदराबादने कोलकाताचा 65 धावांनी धुव्वा उडवला होता. त्यामुळे आता कोलकाता त्या पराभवाची परतफेड करत या हंगामातील तिसरा विजय साकारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दोघांपैकी वरचढ कोण?

हैदराबाद विरुद्ध कोलकाता यांच्यात आतापर्यंत एकूण 31 सामने खेळवण्यात आले आहेत. या 31 पैकी 20 सामन्यांत केकेआरने मैदान मारलं आहे. तर हैदराबादने 11 सामने जिंकले आहेत.

दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार,सनरायजर्स हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. हैदराबादने 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे हैदराबादचा आणखी 2 गुण मिळवून प्लेऑफच्या दिशेने वाटचाल कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर कोलकाता आठव्या स्थानी आहे. केकेआरला 8 पैकी 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. केकेआरने 2 सामने जिंकलेत. तर केकेआरचा पंजाब विरुद्धचा सामना पावसाने वाया घालवला. आता केकेआर आपल्या मोहिमेतील तिसऱ्यांदा विजयी होते की नाही? याकडेही चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?