AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs PBKS Live Streaming : गुजरात पंजाबचा हिशोब करत सहावा सामना जिंकणार?

Gujarat Titans vs Punjab Kings IPL 2026 Live Scorecard : पंजाब किंग्सने गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. त्यामुळे गुजरात या पराभवाची परतफेड करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

GT vs PBKS Live Streaming : गुजरात पंजाबचा हिशोब करत सहावा सामना जिंकणार?
GT vs PBKS Live StreamingImage Credit source: PTI
| Updated on: May 03, 2026 | 6:46 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात रविवारी 3 मे रोजी डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. पंजाबचा हा नववा आणि गुजरातचा दहावा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघांची ही या मोसमात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ असणार आहे. पंजाबने गेल्या सामन्यात गुजरातला पराभूत केलं होतं. त्यामुळे गुजरात गेल्या पराभवाची परतफेड करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कधी?

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना रविवारी 3 मे रोजी होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कुठे?

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स क्रिकेट सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

गेल्या सामन्यात काय झालं होतं?

पंजाब विरुद्ध गुजरात यांच्यात याआधी 31 मार्चला सामना झाला होता. तेव्हा पंजाबने गुजरातवर घरच्या मैदानात 3 विकेट्सने विजय मिळवला होता. पंजाबने विजयासाठी मिळालेलं 163 धावांचं आव्हान हे 5 बॉलआधी 3 विकेट्स राखून पूर्ण केलं होतं. अशात आता गुजरात या पराभवाचा हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पंजाब-गुजरातमध्ये टफ फाईट

पंजाब विरुद्ध गुजरात आतापर्यंत एकूण 7 वेळा आमनेसामने आले आहेत. पंजाबने त्यापैकी 4 सामने जिंकले आहेत. तर गुजरात 3 सामन्यांत यशस्वी ठरली आहे. त्यामुळे एका विजयचा अपवाद वगळल्यास दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती

दरम्यान पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या तर गुजरात पाचव्या स्थानी विराजमान आहे. पंजाबने आतापर्यंत 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तसेच पंजाबचा 1 सामन्यात पराभव झाला आहे. तर पंजाबचा एक सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. तर गुजरातने 9 पैकी 5 सामने जिंकलेत. तर गुजरातला 4 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?