AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs MI : ऋतुराज-कार्तिकचा धमाका, चेन्नईचा जबरदस्त विजय, मुंबईचा 8 विकेट्सने धुव्वा

Chennai Super Kings vs Mumbai Indians Match, IPL 2026 : मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईने हे आव्हान सहज पूर्ण केलं. मुंबई यासह 19 व्या मोसमात चेन्नई विरुद्ध दुसऱ्यांदा अपयशी ठरली.

CSK vs MI : ऋतुराज-कार्तिकचा धमाका, चेन्नईचा जबरदस्त विजय, मुंबईचा 8 विकेट्सने धुव्वा
Karthik Sharma and Ruturaj Gaikwad CSK vs MI IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: May 03, 2026 | 6:03 AM
Share

चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 44 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर एकतर्फी फरकाने विजय मिळवला आहे. चेन्नईने मुंबईचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. मुंबई इंडियन्सने चेन्नईसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईने हे माफक आव्हान एकतर्फी फरकाने सहज पूर्ण केलं. चेन्नईने 11 बॉलआधी आव्हान पूर्ण करत विजय साकारला. चेन्नईने 18.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. चेन्नईचा हा या मोसमातील एकूण  चौथा  आणि मुंबई विरुद्धचा दुसरा विजय ठरला.

मुंबईची बॅटिंग

हार्दिक पंड्या याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र नमन धीर याचा अपवाद वगळता मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली केली. मुंबईसाठी फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. नमनने सर्वाधिक धावा केल्या. नमनने 37 बॉलमध्ये 154.05 च्या स्ट्राईक रेटने 57 रन्स केल्या. नमनने या दरम्यान 3 षटकार आणि 3 चौकार लगावले. रायन रिकेल्टन याने 24 चेंडूत 37 धावांचं योगदान दिलं. सूर्यकुमार यादवने 21 रन्स केल्या. तर कॅप्टन हार्दिक पंड्या याने 23 बॉलमध्ये 18 रन्सची संथ आणि सुमार खेळी केली. तर इतरांना 10 हा आकडाही गाठता आला नाही.

चेन्नईसाठी अंशुलं कंबोज याने 3 विकेट्स मिळवल्या. नूर अहमद याने दोघांना बाहेर पाठवलं. तर जेमी ओव्हरटन आणि रामकृष्ण घोष या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

चेन्नईचा दणदणीत विजय

त्यानंतर चेन्नईच्या पहिल्या 4 फलंदाजांनीच विजयी धावा पूर्ण केल्या आणि 2 गुणांची कमाई केली. संजू सॅमसन याने 11 धावा केल्या. तर उर्विल पटेल याने 24 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन ऋतुराज गायकवाड इम्पॅक्ट प्लेअर कार्तिक शर्मा या जोडीने चेन्नईला विजयापर्यंत पोहचवलं. या दोघांनी 75 बॉलमध्ये नॉट आऊट 98 रन्सची पार्टनरशीप केली.

स्कोअरकार्ड

ऋतुराजने 48 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 67 रन्स केल्या. तर कार्तिकने अर्धशतक करुन इतर फलंदाज असूनही त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पाठवण्याचा टीम मॅनेजमेंटचा निर्णय योग्य ठरवला. कार्तिकने 40 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 54 रन्स केल्या. मुंबईसाठी जसप्रीत बुमराह आणि अल्लाह गजनफर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मुंबईचा हा या मोसमातील सातवा पराभव ठरला.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा