AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो कधीच जान्हवीचा एक्स..; लेकीच्या बॉयफ्रेंडबद्दल काय म्हणाले बोनी कपूर?

शिखर पहाडिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर आणि शिखर हे भाऊ-भाऊ आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात.

तो कधीच जान्हवीचा एक्स..; लेकीच्या बॉयफ्रेंडबद्दल काय म्हणाले बोनी कपूर?
Janhvi Kapoor and Shikhar PahariyaImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2024 | 10:59 AM
Share

अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. जान्हवी ही राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाला डेट करतेय. या दोघांनी उघडपणे रिलेशनशिपची कबुली दिली नसली तरी अनेकदा जान्हवी-शिखरला एकत्र पाहिलं गेलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीचे वडील बोनी कपूर हेसुद्धा शिखरविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. शिखर हा जान्हवीचा कधीच एक्स बनू शकत नाही, असं ते म्हणाले. किंबहुना जेव्हा जान्हवी आणि त्याचं ब्रेकअप झालं होतं, तेव्हासुद्धा शिखर माझ्याशी खूप मैत्रीपूर्ण वागत होता, असं बोनी कपूर यांनी सांगितलं.

‘झूम’ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले, “मला शिखर खूप आवडतो. काही वर्षांपूर्वी जेव्हा जान्हवी त्याला डेट करत नव्हती, तेव्हासुद्धा माझी त्याच्याशी चांगली मैत्री होती. शिखर हा जान्हवीचा कधी एक्स बनू शकत नाही, हे मला त्यावेळी पटलं.” शिखरला अनेकदा जान्हवी आणि तिच्या कुटुंबीयांसोबत पाहिलं गेलंय. जान्हवीच्या संपूर्ण कुटुंबीयांशी त्याचं चांगलं नातं असल्याचं बोनी कपूर यांनी सांगितलं. “कोणतीही मदत लागली तर तो नेहमीच धावून येतो. माझ्यासोबत, जान्हवीसोबत आणि अर्जुनसोबतही त्याचं मैत्रीपूर्ण नातं आहे. त्यामुळे त्याच्यासारखी व्यक्ती आमच्या आयुष्यात असणं हे सुदैवच आहे”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry)

काही दिवसांपूर्वी बोनी कपूर हे जान्हवी आणि शिखरसोबत मुंबईबाहेर जात होते. यावेळी पापाराझींनी जेव्हा फोटोसाठी पोझ द्यायला सांगितलं, तेव्हा बोनी कपूर यांनी शिखरसोबत पोझ देण्यास नकार दिला. यामागचं कारणसुद्धा त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. ते म्हणाले, “गोष्ट एवढीच होती की त्याचे फोटो काढले जावेत अशी त्याची इच्छा नव्हती. यामागचं कारण मला माहित नाही. कदाचित मी प्रकाशझोतात यावं असं त्याला वाटत होतं. तो फ्रेममध्ये आला असता तर सर्वांचं लक्ष त्याच्याकडेच वेधलं जाऊ शकतं, म्हणून त्याने नकार दिला असावा. कदाचित मग हेडलाइन्स शिखर आणि बोनी यांच्याविषयी न होता फक्त बोनी कपूर यांच्याविषयी व्हावेत, म्हणून तो असा वागला.”

जान्हवी कपूरच्या 27 व्या वाढदिवशी ती शिखरसोबत तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनसाठी गेली होती. यावेळी त्यांच्यासोबत जान्हवीचा खास मित्र ऑरीसुद्धा होता.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.