श्रीदेवीसोबतच्या दुसऱ्या लग्नानंतर कशी होती अर्जुनची प्रतिक्रिया? बोनी कपूर यांच्याकडून खुलासा

मोना शौरी यांच्याशी विवाहित असताना निर्माते बोनी कपूर हे अभिनेत्री श्रीदेवी यांच्या प्रेमात पडले होते. बोनी कपूर आणि मोना यांना अर्जुन आणि अंशुला ही दोन मुलं होती. वडिलांनी जेव्हा दुसरं लग्न केलं तेव्हा अर्जुन कपूर त्यांच्यावर खूप चिडला होता.

श्रीदेवीसोबतच्या दुसऱ्या लग्नानंतर कशी होती अर्जुनची प्रतिक्रिया? बोनी कपूर यांच्याकडून खुलासा
अर्जुन कपूर, बोनी कपूर, श्रीदेवीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 10:51 AM

निर्माते बोनी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे. बोनी कपूर विवाहित असताना श्रीदेवी यांच्या प्रेमात पडले होते. याची माहिती त्यांची पहिली पत्नी मोना शौरी यांनासुद्धा होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. बोनी कपूर हे श्रीदेवी यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. श्रीदेवी यांचं मन जिंकण्यासाठी त्यांनी जवळपास पाच ते सहा वर्षे घालवली होती. अखेर या दोघांनी लग्न केलं. बोनी कपूर यांच्या दुसऱ्या लग्नाच्या वेळी त्यांना पहिल्या पत्नीपासून अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन मुलं होती. आपल्या वडिलांनी आईला सोडून दुसरं लग्न केलं, याचा प्रचंड राग अर्जुनच्या मनात होता. यामुळे पिता-पुत्राच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. कारण अर्जुनला आपल्या आईचं दु:ख सहन झालं नाही.

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी सांगितलं की जेव्हा त्यांनी श्रीदेवी यांच्याशी लग्न केलं, तेव्हा मुलगा अर्जुनची प्रतिक्रिया काय होती? ते म्हणाले, “त्यावेळी मी त्याच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी त्याच्या रागाला किंवा वागणुकीला उलट उत्तर देणं टाळलं होतं. कारण तो असं का वागतोय, हे मला माहित होतं.” श्रीदेवी यांच्याशी दुसऱ्या लग्नानंतर मुलगा अर्जुन आणि मुलगी अंशुला यांनी वडील बोनी कपूर यांच्याशी बोलणंच बंद केलं होतं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

24 फेब्रुवारी 2028 रोजी श्रीदेवी यांचं दुबईतील एका हॉटेलमधल्या बाथटबमध्ये बुडून निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर अर्जुन आणि बोनी कपूर यांच्या नात्यात सुधारणा होऊ लागली होती. श्रीदेवी यांच्या निधनानंतर जेव्हा बोनी कपूर आणि त्यांच्या दोन्ही मुलगी दु:खात होत्या, तेव्हा अर्जुनने त्यांची साथ दिली. जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन्ही सावत्र बहिणींनाही त्याने सावरलं. बहिणींसोबत असलेल्या नात्यातील कटुता दूर करत अर्जुनने भावाचं कर्तव्य बजावलं होतं. आता बोनी कपूर यांची चारही मुलं एकमेकांसोबत आहेत.

अर्जुन अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या आईच्या आठवणी शेअर करताना दिसतो. होळीच्या निमित्ताने अर्जुनने आपल्या दिवंगत आईसाठी भावनिक पोस्ट लिहिली होती. मौना शौरी यांच्या निधनाला 12 वर्षे झाली आहेत. आईसोबतचा फोटो शेअर करत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.