AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Border 2 Box Office Collection Day 1 : सनी देओलच्या बॉर्डर 2 ची धुरंधरवर यशस्वी मात, पहिल्याच दिवशी दणदणीत कमाई

Border 2 Box Office Collection Day 1 : बहुचर्चित, बहुप्रतिक्षित बॉर्डर 2 सिनेमा रिलीज झालाय. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाच्या कमाईचा आकडाच सर्वकाही सांगून जातोय. बॉर्डर 2 च सनी देओल मुख्य आकर्षण आहे. याआधी पहिल्या बॉर्डरच्या यशात सनी देओलचा मोठा वाटा होता.

Border 2 Box Office Collection Day 1 : सनी देओलच्या बॉर्डर 2 ची धुरंधरवर यशस्वी मात, पहिल्याच दिवशी दणदणीत कमाई
Border 2 Feature
| Updated on: Jan 24, 2026 | 9:25 AM
Share

बहुप्रतिक्षित बॉर्डर सिनेमा थिएटरमध्ये काल रिलीज झाला. मागच्या अनेक महिन्यांपासून बॉर्डर 2 ची चर्चा होती. सनी देओल, वरुण धवन, दिलीजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांचे या चित्रपटात मुख्य रोल आहेत. मागच्या दीड महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर धुरंधरचंच वर्चस्व आहे. पण आता बॉर्डर 2 रिलीज झाल्यानंतर रणवीर सिंहच्या धुरंधरच्या कमाईत सातव्या आठवड्या घसरण झालीय. ओरिजनल बॉर्डर सिनेमा 1997 साली रिलीज झालेला. हा चित्रपट त्यावेळी तुफान हिट झालेला. त्यात 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा एक भाग दाखवण्यात आला होता. आता बॉर्डर 2 ची कथा सुद्धा 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. सनी देओल या चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे. बॉर्डर 2 मधूनही युद्धाचा थरार उभा करण्यात आला आहे.

बॉर्डर 2 जगभरात रिलीज झाला असून या चित्रपटाला जवळपास 4500 स्क्रिन्स मिळाल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाला जोडून आलेला वीकएन्ड त्यामुळे बॉर्डर 2 कडून कमाईच्या बाबतीत मोठ्या अपेक्षा आहेत. Sacnilk नुसार, Advance बुकिंगमधूनच बॉर्डर 2 ला दमदार ओपनिंग मिळणार असल्याचे संकेत मिळत होते. Advance बुकिंग आणि कालच्या तिकीट विक्रीतून पहिल्या दिवशीच बॉर्डर 2 ने बॉक्स ऑफिसवर 30 कोटीची कमाई केल्याचा अंदाज आहे.

बॉर्डर 2 बद्दल क्रेझ

पहिल्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत बॉर्डर 2 धुरंधरला मागे टाकलं आहे. कारण धुरंधरने ओपनिंग डे ला 28 कोटींची कमाई केली होती. आता बॉर्डर 2 बॉक्स ऑफिसवरील हीच पकड कायम ठेवते का? ते बऱ्याच प्रमाणात माऊथ पबलिसिटी म्हणजे सर्वसामान्यांना हा चित्रपट कसा वाटतो, त्यावर अवलंबून आहे. आदित्य धरच्या धुरंधरच्या बाबतीत माऊथ पबलिसिटी महत्वाची ठरली. त्यामुळे चित्रपटाने पहिल्या आठवड्यापेक्षा दुसऱ्या आठवड्यात चांगली कमाई केली. बॉर्डर 2 बद्दल एक क्रेझ दिसून येतेय. सलग तीन-चार दिवसांच्या सुट्टयांमुळे बॉर्डर 2 ला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. पण आता सर्वकाही प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे.

शुक्रवारी 50 व्या दिवशी धुरंधरने किती कमाई केली?

पहिल्या आठवड्यातच बॉर्डर 2, 100 कोटी कमाईचा टप्पा पार करेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. या चित्रपटाचे रिव्यू निगेटिव आलेले नाहीत. त्यामुळे युद्धाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर गर्दी खेचेल अशी अपेक्षा आहे. धुरंधरने 830 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. शुक्रवारी धुरंधरने 50 व्या दिवशीही 59 लाखाची कमाई केली.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.