AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 34 व्या वर्षी निधन; 5 दिवस आधी व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा

‘ब्रेकिंग बॅड’व्यतिरिक्त त्याने ‘स्विच्ड अ‍ॅट बर्थ’ आणि ‘द गार्डियन्स ऑफ जस्टिस’ यांसारख्या सीरिजमध्येही काम केलं. त्याच्या अभिनय कारकिर्दीबरोबरच सामाजिक कार्यामुळेही त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 34 व्या वर्षी निधन; 5 दिवस आधी व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा
अभिनेता आरजे मिट्टेImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 13, 2026 | 10:26 AM
Share

हॉलिवूड मनोरंजनविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अमेरिकन वेब सीरिज ‘ब्रेकिंग बॅड’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता आरजे मिट्टे (RJ Mitte) याचं वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी निधन झालं आहे. 12 ऑक्टोबर 2026 रोजी त्याने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली. त्याच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, मृत्यूच्या अवघ्या पाच दिवस आधी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने ‘ब्रेकिंग बॅड’मधील आपल्या गाजलेल्या भूमिकेबद्दल आणि व्हाइट कुटुंबाची कथा पुन्हा पडद्यावर येण्याच्या शक्यतेबद्दल इच्छा व्यक्त केली होती.

आरजे मिट्टे याने 7 ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ जो व्हुल्पिस यांच्या पॉडकास्टमधील चर्चेचा भाग होता. या मुलाखतीमध्ये त्याने ‘ब्रेकिंग बॅड’ या लोकप्रिय मालिकेतील कथेबद्दल आपलं मत मांडलं होतं. सीरिजचा शेवट झाला असला, तरी व्हाइट कुटुंबाची कथा पूर्णपणे संपलेली नाही, असं त्याला वाटत होतं. वॉल्टर व्हाइट, स्कायलर आणि त्यांची मुलगी होली यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अजूनही प्रेक्षकांसमोर येऊ शकतात, असं त्याने सूचित केलं होतं. त्याच्या मते, सीरिजचा शेवट हा मुख्यतः हेझेनबर्गच्या प्रवासाचा शेवट होता; संपूर्ण कुटुंबाची कथा तिथेच संपली असं म्हणता येणार नाही. त्यामुळे या सीरिजच्या चाहत्यांमध्ये त्याच्या या वक्तव्याची चर्चा झाली होती.

‘ब्रेकिंग बॅड’मधील वॉल्टर ज्युनियरची भूमिका ठरली खास

आरजे मिट्टे याला ‘ब्रेकिंग बॅड’ या अमेरिकन ड्रामा सीरिजमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. या सीरिजमध्ये त्याने वॉल्टर व्हाइट ज्युनियर अर्थात फ्लिन ही भूमिका साकारली होती. अभिनेता ब्रायन क्रॅन्स्टन याने वॉल्टर व्हाइटची, तर अ‍ॅना गन हिने स्कायलर व्हाइटची भूमिका साकारली होती. मालिकेतील वॉल्टर ज्युनियर हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिलं.

आरजे मिट्टे याला लहानपणीच सेरेब्रल पाल्सी असल्याचं निदान झालं होतं. विशेष म्हणजे, त्याने साकारलेल्या वॉल्टर ज्युनियर या पात्रालाही हीच स्थिती दाखवण्यात आली होती. स्वतःच्या अनुभवांचा उपयोग करून त्याने या भूमिकेला वास्तववादी स्पर्श दिला. त्यामुळे त्याची भूमिका केवळ अभिनयापुरती मर्यादित राहिली नाही, तर दिव्यांग व्यक्तींचं प्रतिनिधित्व आणि त्यांच्या अनुभवांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठीही महत्त्वाची ठरली.

आरजे मिट्टे हा केवळ अभिनेता नव्हता, तर दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी काम करणारा सामाजिक कार्यकर्ताही होता. त्याने युनायटेड सेरेब्रल पाल्सी आणि श्रायनर्स चिल्ड्रन्स यांसारख्या संस्थांसाठी अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम केलं होतं. तसेच, दिव्यांग व्यक्तींना समाजात समान संधी आणि योग्य प्रतिनिधित्व मिळावं, यासाठीही तो प्रयत्नशील होता. आरजे मिट्टे याच्या निधनाचं वृत्त त्याच्या प्रतिनिधींनी जाहीर केलं. सुरुवातीच्या वृत्तांमध्ये मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालं नव्हतं.

Follow Us
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा