AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breakup Story : सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये, नेमकं असं काय घडलं ज्याने रणबीर आणि कतरिनाला वेगळं व्हावं लागलं?

रणबीर आणि कतरिनाच्या प्रेमाची आजही चर्चा होते. मात्र, असं नेमकं काय घडलं ज्यामुळे दोघांना वेगळं व्हावं लागलं? याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (Breakup Story Of Katrina Kaif and Ranbir Kapoor).

Breakup Story : सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये, नेमकं असं काय घडलं ज्याने रणबीर आणि कतरिनाला वेगळं व्हावं लागलं?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 21, 2021 | 4:44 PM
Share

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यात जेव्हा प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली तेव्हा खूप चर्चा रंगली होती. याशिवाय त्याचं जेव्हा ब्रेकअप झालं तेव्हा देखील खूप चर्चा झाली. कतरिना आणि रणबीर जवळपास सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, दोघांनी कधीही उघडपणे आपल्या प्रेमाचा स्वीकार केला नाही. ते वेगळे होऊन आता बराच कालावधी लोटलाय. तरीही आजदेखील रणबीर आणि कतरिनाच्या प्रेमाची चर्चा होते. मात्र, असं नेमकं काय घडलं ज्यामुळे दोघांना वेगळं व्हावं लागलं? याबाबतची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (Breakup Story Of Katrina Kaif and Ranbir Kapoor).

कतरिना आणि रणबीरची प्रेमकहाणी

रणबीर आणि कतरिना यांचा 2009 मध्ये ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ हा चित्रपट आला. या चित्रपटाच्या शूटिंगपासूनच दोघांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली. दोघं या चित्रपटाच्या शूटिंगवेळी एकमेकांचे चांगले मित्र बनले. त्यानंतर 2010 मध्ये त्यांच्या ‘राजनीती’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी दोघांमधील नातं आणखी घट्ट बनलं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कतरिना आणि रणबीर यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा रंगायला सुरुवात झाली. याच चित्रपटावेळी दोघांचा एकमेकांवर जीव जडला. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते एकमेकांशी बातचित करताना आणि एकमेकांना वेळ देताना दिसायचे.

दोघांचा फोटो व्हायरल

पुढे काही दिवसांनी रणबीर आणि कतरिना यांचे काही बोल्ड फोटो समोर आले. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या वृत्ताना दुजोरा देण्यात आला. त्यांच्या अफेअरची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. या फोटोत कतरिना बिकनीत दिसली होती. तर रणबीर बरमोडा पँटवर बीचवर दिसला होता (Breakup Story Of Katrina Kaif and Ranbir Kapoor).

रणबीर-कतरिनाच्या लग्नाचीही चर्चा

रणबीर आणि कतरिना यांचं लग्न होणार, अशा देखील चर्चा मधल्या काळात सुरु होत्या. 2014 साल उजाडल्यानंतर दोघांच्या प्रेमाबाबत जगजाहीर झालं होतं. दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. दोघं एकमेकांमध्ये एवढे गुंतले की लग्न, लग्नानंतर मुलं या सगळ्या गोष्टींची त्यांनी आधीच प्लॅनिंग केल्याची चर्चा होती. मात्र, नियतीने वेगळंच काहीतरी लिहिलं होतं.

कतरिना आणि रणबीर यांचा कधी ब्रेकअप होईल, असा विचारही कुणाच्या मनात आला नव्हता. मात्र, अचानक ते वेगळे झाले. त्यांच्या ब्रेकअपमुळे अनेकांना धक्का बसला. त्यांच्यात ब्रेकअप का झाला? याबाबत काहीच माहिती समोर येत नव्हतं. त्यानंतर काही दिवसांनी आलेल्या बातम्यांनुसार रणबीर कपूरची आई नीता कपूर यांना कतरिना पसंत नव्हती, अशी माहिती समोर आली. त्याच कारणामुळे दोघांमध्ये दुरावा आला. मात्र, दोघांनीही या विषयावर कधीच भाष्य केलं नाही.

कतरिना नैराश्यात

दरम्यान, एका मुलाखतीत कतरिनाने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. “कुणीही असूद्या, जुन्या गोष्टींबाबत माझ्या मनात काहीच नाही. कुणी माझं मन दुखवलंय, असं मला वाटत नाही. प्रत्येकजण स्वत: साठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अनेकदा काहीतरी चांगलं देण्याच्या नादात आपण स्वत:चं नुकसान करुन बसतो. त्यामुळेच मला मित्रांपेक्षा शत्रूंवर जास्त विश्वास आहे. ब्रेकअप वाईट आहे. ब्रेकअप या जगातील सर्वात वाईट आणि भयानक गोष्ट आहे. ब्रेकअपमुळे आयुष्यात आता काहीच राहीलं नाही, असं वाटतं”, असं कतरिना म्हणाली होती. रणबीर सोबतच्या ब्रेकअपनंतर कतरिना प्रचंड नैराश्यात गेली होती.

आता पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय

मात्र, आता पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. दोघंही आपल्या आयुष्यात पुढे गेलेत. रणबीर लवकरच आलिया भट्ट सोबत लग्न करण्याची शक्यता आहे. तर कतरिना आणि विकी कौशल यांच्याही प्रेम प्रकरणाची सध्या चर्चा आहे.

हेही वाचा : अमेरिकेची भारताला धमकी, रशियाकडून S-400 मिसाईल सिस्टम खरेदी करण्यावर ‘ही’ भूमिका

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?