AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेची भारताला धमकी, रशियाकडून S-400 मिसाईल सिस्टम खरेदी करण्यावर ‘ही’ भूमिका

अमेरिकेने भारताच्या रशियाकडून S-400 मिसाईल सिस्टमच्या (S-400 Missile System) खरेदीच्या मुद्द्यावर सूचक इशारा दिलाय.

अमेरिकेची भारताला धमकी, रशियाकडून S-400 मिसाईल सिस्टम खरेदी करण्यावर 'ही' भूमिका
| Updated on: Mar 21, 2021 | 3:55 PM
Share

मुंबई : अमेरिकेने भारताला अप्रत्यक्षरित्या धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. अमेरिकेने भारताच्या रशियाकडून S-400 मिसाईल सिस्टमच्या (S-400 Missile System) खरेदीच्या मुद्द्यावर सूचक इशारा दिलाय. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन (US Defense Secretary Lloyd Austin) म्हणाले, “भारताने रशियाकडून (Russia) ही मिसाईल सिस्टम खरेदी केल्यास भारतावर निर्बंध लादण्यात येतील.” ऑस्टिन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. असं असलं तरी त्यांची या विषयावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा झालेली नाही. ऑस्टिन यांनी अमेरिकेच्या मित्र देशांना रशियाकडून कोणत्याही प्रकारची शस्त्रास्त्र खरेदी न करण्याचा आग्रह केलाय. अन्यथा निर्बंध लागू होतील, असा इशाराही दिलाय (US Defense Secretary Lloyd Austin warn India over S-400 Missile System deal with Russia).

ऑस्टिन म्हणाले, “एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीचा पुरवठा भारताला झालेला नाही. त्यामुळे भेटीत या विषयावर चर्चा झालेली नाही. त्यामुळे या व्यवहारानंतरच्या निर्बंधांवरही चर्चा झालेली नाही. भारताने अद्याप ही प्रणाली स्वीकारलेली नसल्याने सध्या या मुद्द्यावर चर्चा करण्यात कोणताही अर्थ नाही.” रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केल्याने अमेरिकेने तुर्कीवर याआधीच निर्बंध लावले आहेत. ‘आमच्यासोबत असे देश आहेत ज्यांच्यासोबत आम्ही वेळोवेळी काम करतो,’ असंही ऑस्टिन म्हणाले.

भारत-रशियात 5 अरब डॉलरचा करार

भारताने रशियासोबत ऑक्टोबर 2018 मध्ये 5 अरब डॉलरचा (500 कोटी डॉलर) करार झालाय. S-400 एअर डिफेंस मिसाईल सिस्टम शत्रुच्या कोणत्याही विमानाला हवेतच नष्ट करु शकते. जमिनीवरुन आकाशात मारा करणारी ही प्रणाली रशियाच्या शक्तीशाली हत्यारांपैकी एक आहे. हे क्षेपणास्त्र केवळ विमानच नाही, तर क्रूज आणि बॅलेस्टिक मिसाईलही नष्ट करते.

हेही वाचा :

हुकुमशाह किमच्या बहिणीचा थेट अमेरिकाला इशारा, ‘4 वर्षे शांतपणे झोपायचं असेल, तर स्फोटकांच्या दुर्गंधीपासून दूर राहा’

इराकमध्ये अमेरिकेच्या सैन्यावर 13 मिसाईल हल्ले, बायडन सरकारची रणनीती काय?

ब्रम्हपुत्रेच्या लाल तांदळाची अमेरिकेला भुरळ, भारताकडून भरभरून खरेदी

व्हिडीओ पाहा :

US Defense Secretary Lloyd Austin warn India over S-400 Missile System deal with Russia

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.