हुकुमशाह किमच्या बहिणीचा थेट अमेरिकाला इशारा, ‘4 वर्षे शांतपणे झोपायचं असेल, तर स्फोटकांच्या दुर्गंधीपासून दूर राहा’

उत्तर कोरियाचे (North Korea) हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांची बहिण किम यो जोंगने थेट अमेरिकेलाच इशारा दिलाय.

हुकुमशाह किमच्या बहिणीचा थेट अमेरिकाला इशारा, ‘4 वर्षे शांतपणे झोपायचं असेल, तर स्फोटकांच्या दुर्गंधीपासून दूर राहा’
Kim Yo Jong


प्योंगयांग : उत्तर कोरियाचे (North Korea) हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांची बहिण किम यो जोंगने थेट अमेरिकेलाच इशारा दिलाय. किम यो जोंग (Kim Yo Jong) म्हणाल्या, “अमेरिकेला 4 वर्षे शांततेत झोपायचं असेल तर त्यांनी उत्तर कोरियाला भडकावण्यापासून दूर राहिलं पाहिजे.” अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऑस्टिन लॉयड आणि परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन जपान आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यासाठी टोकियोला पोहचले आहेत. अशावेळी यो जोंग यांनी अमेरिकेला इशारा देणारं हे विधान केलंय. या दौऱ्यात उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरही चर्चा होण्याची शक्यता आहे (Kim Yo Jong sister of North Korea dictator Kim Jong Un warn America).

किंम यो जोंग या उत्तर कोरियाचा प्रमुख किम जोंग उन यांच्या सल्लागार आहेत. त्यामुळे त्यांचं हे विधान अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी स्पष्ट संदेश आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने मागील आठवड्यात संयुक्त सैन्य सरावही सुरु केलाय. प्योंगयांगमधील सरकारचं अधिकृत वृत्तपत्र रोडोंग सिनमुन (Rodong Sinmum) सोबत झालेल्या चर्चेत किम यो जोंग म्हणाल्या, “अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांना आम्ही महत्त्वाचा सल्ला देतो. जो कुणी आमच्या जमिनीवर स्फोटकांचा दुर्गंध पसरवण्याचा प्रयत्न करेल त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल. अमेरिकेला पुढील 4 वर्षे शांततेत झोपायचं असेल तर त्यांनी स्फोटकांपासून दूर राहणं हेच योग्य आहे.”

उत्तर कोरियाचा जो बायडेन यांना अमेरिकेचा अध्यक्ष मानण्यास नकार

दरम्यान याआधी अमेरिकेने म्हटलं होतं, “अमेरिका मागील अनेक आठवड्यांपासून उत्तर कोरियाच्या सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यात अद्याप यश आलेलं नाही.” दुसरीकडे जो बायडेन यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन 3 महिन्यांचा काळ लोटलाय, पण उत्तर कोरियाने बायडेन यांना अमेरिकेचा अध्यक्ष मानण्यासच नकार दिलाय.दोन्ही देशांमध्ये क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमावरुन वाद सुरु आहे. व्हाइई हाऊसने सोमवारी (15 मार्च) म्हटलं की, “माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या कार्यकाळापासून उत्तर कोरियाचे संबंध जसे आहेत ते तसेच ठेवले जातील.”

दक्षिण कोरिया-अमेरिकेच्या संयुक्त सैन्य सरावाने उत्तर कोरियाचा तिळपापड

मागील आठवड्यात अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याने संयुक्त युद्ध सराव सुरु केलाय. त्यामुळे उत्तर कोरियाचा चांगलाच तिळपापड झालाय. किम जो योंगने सरकारी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, युद्ध सराव आणि शत्रुत्व कधीही चर्चा आणि मदतीसोबत चालू शकत नाही.

हेही वाचा :

किम जोंग चौथ्यांदा बाबा होण्याची चर्चा, त्यातच ‘गायब’ पत्नीचं वर्षभरानंतर अचानक दर्शन

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनकडून हैराण करणाऱ्या शुभेच्छा

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग यांना तयार करण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून जोरदार प्रयत्न

व्हिडीओ पाहा :

Kim Yo Jong sister of North Korea dictator Kim Jong Un warn America

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI