AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला सलमानच्या सुरक्षेमुळे…

अभिनेता सलमान खान सध्या चिंतेत आहे. कारण त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत आणखी वाझ करण्यात आली आहे. कारण त्यांची हत्या बिश्नोई गँगने केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ज्यांनी सलमान खानला मारण्याची धमकी दिलीये. यावर आता सलमानचा भाऊ अरबाज खानने प्रतिक्रिया दिली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला सलमानच्या सुरक्षेमुळे...
| Updated on: Oct 16, 2024 | 5:53 PM
Share

Arbaaz Khan On Salman Khan Safety : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे खान कुटुंबीय चिंतेत आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पहिल्यांदाच अरबाजने खानने मौन तोडले आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी ते सर्वजण काय करत आहेत हे त्याने सांगितले आहे. सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगने आधीच धमकी दिली आहे. सलमान खानशी जवळीकतेमुळे बाबा सिद्दिकी यांच्या हत्या केल्याचं लॉरेन्स बिश्नोई गँगने म्हटले आहे. त्यामुळे सलमान खानच्या जीवाला धोका असून सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

सिद्दीकी यांच्या निधनानंतर काळजी वाढली

सलमानचा भाऊ अरबाज खान याने बाबा सिद्दिकी यांच्या निधनानंतर ‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, आम्ही पूर्णपणे ठीक आहोत असे मी म्हणणार नाही. अरबाज खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बंद सिंह चौधरी’चे प्रमोशन करत आहे. अभिनेत्याने सांगितले की बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर सध्या कुटुंबात प्रत्येकजण काळजीत आहे.

यादरम्यान अरबाज पुढे म्हणाला की, ‘या सगळ्यात मला माझ्या चित्रपटाचे प्रमोशनही करायचे आहे, त्यासाठी मी कटिबद्ध आहे. माझा चित्रपट २५ ऑक्टोबरला येत आहे आणि तो प्रदर्शित होईल याची मला खात्री करावी लागेल. खूप काही घडतंय. परंतु मला माझे काम करावे लागेल.

सलमानच्या सुरक्षेबद्दल काय म्हणाला अरबाज

अरबाज खानला विचारण्यात आले की, सलमानचे कुटुंब त्याच्या संरक्षणासाठी कसे प्रयत्न करत आहे? कुटुंब त्याचा मोठा भाऊ सलमानची सुरक्षा कशी हाताळत आहे, यावर तो म्हणाला, ‘आम्ही शक्य तितके प्रयत्न करत आहोत. सरकार आणि पोलिसांसह प्रत्येकजण या गोष्टीची काळजी घेत आहेत.  तो (सलमान) सुरक्षित राहावा यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि सध्या आपल्याला असेच राहायचे आहे.’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर तीन जणांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. पण पोलीस वेगवेगळ्या अँगलने याचा तपास करत आहेत.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.