प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचार; पती विरोधात खटला दाखल
एका बॉलिवूड अभिनेत्रीने पतीविरोधात शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि आर्थिक छळाचा आरोप करत मुंबई न्यायालयात धाव घेतली आहे. तिने 50 कोटी भरपाई आणि मासिक पोटगीची मागणी केली आहे. न्यायालयाने हागला नोटीस बजावली असून, घरगुती हिंसाचार कायद्यान्वये हा खटला दाखल झाला आहे.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी घरगुती हिंसाचाराचे कारण देत पतीपासून वेगळे झालेत. तसेच नवऱ्यावर खटलाही दाखल केला आहे. त्यात आता अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री तथा माजी मिस इंडिया सेलिना जेटली हिने तिचा पती ऑस्ट्रियन नागरिक पीटर हाग विरोधात घरगुती हिंसाचाराचा आरोप करत मुंबई न्यायालयात धाव घेतली आहे. अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने मंगळवारी हाग यांना नोटीस बजावली असून या प्रकरणाची सुनावणी 12 डिसेंबर रोजी होणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्रीचा पतीविरोधात मुंबई न्यायालयात खटला
बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली हिने मुंबईच्या न्यायालयात 50 कोटी रुपयांची भरपाई आणि 10 लाख रुपयांच्या मासिक पोटगीची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे . सेलिनाचा आरोप आहे की पीटर हागने तिच्यावर शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि आर्थिक अत्याचार केले. सेलिनाने तिच्या याचिकेत म्हटले आहे की पीटर हागने तिचे आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेतले आणि तिला काम करण्यापासून रोखले. पीटर हागने तिला मोलकरीण म्हणून बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला असाही तिचा आरोप आहे.
बॉलिवूड अभिनेत्रीचा पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप
“नो एंट्री” आणि “गोलमाल रिटर्न्स” सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या जेटलीने 2005 च्या घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. अभिनेत्रीने म्हटले आहे की तिचा इतका छळ करण्यात आला की तिला मध्यरात्री ऑस्ट्रियातील तिचे सोडून 11 ऑक्टोबर रोजी भारतात परतण्यास भाग पडले आणि तिच्या तीन मुलांना सोडून ती भारतात परतली.
View this post on Instagram
मुलांना भेटण्याची परवानगी पतीने नाकारली
14 नोव्हेंबर वगळता हागने तिला मुलांना भेटण्याची किंवा त्यांच्याशी बोलण्याची परवानगी दिली नाही, असा आरोप करून जेटलीने मुलांशी संपर्क साधण्यास नकार देऊ नये अशी विनंतीही केली आहे. याचिकेत असेही म्हटले आहे की हागने ऑस्ट्रियामध्ये घटस्फोटाची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. या जोडप्याने 2011 मध्ये लग्न केले होते.
पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी 32 लाख रुपयांची मागणी
सेलिनाने असेही निर्देश देण्याचे मागणी केली आहे की हागने मुंबईतील अंधेरी येथील त्यांच्या शेअर केलेल्या घराच्या ताब्यामध्ये आणि शेअर्समध्ये हस्तक्षेप करू नये. मुंबई आणि व्हिएन्नामधील मालमत्ता त्यांच्या नियंत्रणातून काढून टाकल्यामुळे झालेल्या कथित नुकसानासाठी तिने 1.26 कोटी रुपये आणि तसेच पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी 32 लाख रुपयांची मागणी केली आहे.
