AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाआधी ‘हा’ करार आवर्जून करा; अभिनेत्रीचा मुलींना सल्ला, म्हणाली “एकदा गोष्टी बिघडल्या की..”

स्वत:च्या वेदनादायी अनुभवांनंतर अभिनेत्री सेलिना जेटलीने लग्न करणाऱ्या महिलांना आणि मुलींना हा खास सल्ला दिला आहे. विवाहपूर्व करार करण्याचा सल्ला तिने दिला आहे. प्रेमाच्या नात्यातही आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचं असल्याचं ती म्हणते.

लग्नाआधी 'हा' करार आवर्जून करा; अभिनेत्रीचा मुलींना सल्ला, म्हणाली एकदा गोष्टी बिघडल्या की..
सेलिना जेटली, पीटर हागImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 08, 2026 | 1:41 PM
Share

लग्न हे प्रेम, विश्वास, वचनं यांवर आधारित बंधन असल्याचं अनेकदा म्हटलं जातं. परंतु हल्लीच्या आधुनिक काळात या लग्नसंस्थेला पूर्णपणे वेगळंच स्वरुप प्राप्त झालं आहे. दोन व्यक्तींच्या नात्यातील आर्थिक सुरक्षितता, हा देखील सध्या चर्चेचा विषय बनला आहे. जेव्हा एखाद्या जोडप्याचा संसार संपुष्टात येतो आणि ते विभक्त होतात, तेव्हा त्यांच्या मुलांवर त्याचा परिणाम झाल्याचं पहायला मिळतं. अभिनेत्री सेलिना जेटली सध्या अशाच कठीण काळाचा सामना करत आहे. सेलिनाने तिच्या आयुष्यात जे काही सहन केलं, त्यानंतर तिने लग्न करू पाहणाऱ्या मुलींना आणि महिलांना एक सल्ला दिला आहे. ज्या महिलांकडे स्वत:ची मालमत्ता आहे, त्यांनी लग्नाआधीच विवाहपूर्व करार करावा, असा सल्ला तिने दिला आहे. प्रेमावर आधारित नात्यांमध्येही आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचं असतं, असं तिने म्हटलंय.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सेलिना म्हणाली, “मुलींनो, तुमची स्वत:ची मालमत्ता असेल तर कृपया विवाहपूर्व करार करा, असा मी सल्ला देईन. नातेसंबंधांची सुरुवात अनेकदा प्रेम आणि कायम एकत्र राहण्याच्या वचनांनी होते, परंतु दोन व्यक्तींमधील मतभेद विकोपाला जाऊ शकतात आणि एकदा गोष्टी बिघडल्या की शेवटी ते प्रकरण मालमत्ता आणि संपत्तीपर्यंत येऊन पोहोचू शकतं. अगदी घट्ट भावनिक बंधसुद्धा नंतर भौतिक मालमत्तेच्या वादात बदलू शकतात.” सेलिनाने असा सल्ला देण्यामागे तिचा स्वत:चा कटू अनुभव आहे.

सेलिना जेटली सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यात खूप कठीण काळाचा सामना करत आहे. पती पीटर हागसोबत तिचा घटस्फोटाचा खटला सुरू आहे. मुलांचा ताबा मिळावा, यासाठी ती प्रयत्न करत आहे. सेलिनाने तिचा पती पीटर हागवर कौटुंबिक हिंसाचार, मारहाण आणि शारीरिक छळाचे आरोप केले आहेत. या दोघांमधील वाद आता संपत्तीच्या मुद्द्यांपर्यंत पोहोचला आहे.

सेलिनाची वकील निहारिका मिश्रा यांनी ‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “पीटरने सेलिनाचे सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्ड्स काढून घेतले होते. तो स्वत:चा आणि कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी सेलिनाच्या सर्व सेव्हिंग्स वापरत होता. सेलिना जेव्हा त्याला त्याच्या पगाराबद्दल विचारायची, तेव्हा तो खूप चिडायचा. नंतर असंही उघड झालं की पीटरने गेल्या वर्षी व्हिएन्नामध्ये त्यांनी एकत्र खरेदी केलेली मालमत्ता तिला न कळवता परस्पर विकली होती. सध्या ऑस्ट्रियामध्ये पीटर कायदेशीर कायर्वाहीद्वारे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे की सेलिनाचा कोणताही संयुक्त मालमत्तेवर हक्क नाही.”

सेलिनाने असाही खुलासा केला की तिच्या पतीने तिच्याकडून 20 कोटी रुपयांची मालमत्ता स्वत:च्या नावावर हस्तांतरित करवून घेतली. नंतर त्याने लग्नापूर्वी तिच्या मालकीच्या मालमत्तेवरूनही तिचा हक्क काढून घेतला. लग्नाच्या 15 व्या वाढदिवशी तिला पतीने घटस्फोटाची कागदपत्रे पाठवली होती. सेलिना आणि पीटर हाग यांनी 2010 मध्ये ऑस्ट्रियामध्ये लग्न केलं. त्यांना तीन मुलं आहेत.

Follow Us
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट..
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट...
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील बैठकीत...