AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुष्मिता सेनने वहिनी चारू असोपाला दिला घटस्फोटाचा सल्ला?

भावाच्या घटस्फोटाबाबत सुष्मिताची काय प्रतिक्रिया? वहिनीने केला खुलासा

सुष्मिता सेनने वहिनी चारू असोपाला दिला घटस्फोटाचा सल्ला?
Charu Asopa and Sushmita SenImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 03, 2022 | 7:16 PM
Share

मुंबई- टेलिव्हिजन अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेन यांचं वैवाहिक आयुष्य गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. या दोघांनी एकमेकांवर सार्वजनिकरित्या बरेच आरोप केले आहेत. इतकंच नव्हे तर चारूने राजीवला घटस्फोट देणार असल्याचं जाहीर केलं आहे. चारूने राजीववर विवाहबाह्य संबंधाचाही आरोप केला आहे. राजीव हा अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावर सुष्मिताची काय प्रतिक्रिया आहे, हे अनेकांना जाणून घ्यायचं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चारूने सुष्मिताच्या प्रतिक्रियेविषयी भाष्य केलं आहे.

आरजे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत चारू म्हणाली की तिची नणंद सुष्मिताने कधीच तिला बळजबरीने वैवाहित नात्यात राहण्याचा सल्ला दिला नाही. “तुला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो, तेच कर असं नेहमीच ती सांगायची. मी माझ्या वैवाहिक आयुष्यातील समस्या सांगायला तिला कधी फोन नाही केला. मात्र सुष्मिताला जेव्हा वेळ असतो तेव्हा ती आवर्जून मला फोन करते, माझ्याशी गप्पा मारते. जर तू या लग्नात खूश असशील तरच पुढचा प्रवास कर, अन्यथा त्यातून बाहेर पड असं ती सांगायची,” असं चारू म्हणाली.

“राजीव घरातून निघून गेला आणि कोणालाच त्याच्याविषयी माहीत नव्हतं. मागच्या वेळी जेव्हा आम्ही नात्याला आणखी एक संधी देण्याचा विचार केला तेव्हा संपूर्ण कुटुंब खूश होतं. मात्र त्याने मला ड्रामेबाज आणि मानसिकरित्या आजारी असल्याचं म्हटलं. राजीव अचानक घर सोडून निघून जायचा. तो कुठे आहे, कसा आहे हे कोणालाच कळायचं नाही”, असं ती पुढे म्हणाली.

राजीव सेन आणि चारू असोपा यांनी 2019 मध्ये लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर लगेचच या दोघांच्या नात्यात विविध समस्या निर्माण होऊ लागल्या. विभक्त होण्यापूर्वी पुन्हा एकदा एकमेकांना संधी देण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. मात्र त्याचाही काही परिणाम झाला नाही. त्यामुळे आता दोघंही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम आहेत.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.