Cheetah: देशात चित्ते परतल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर; तुम्हीही पोट धरून हसाल!

| Updated on: Sep 20, 2022 | 4:31 PM

हे नाही पाहिलं तर काय पाहिलं? चित्त्यांवरून बॉलिवूड मीम्सना उधाण

Cheetah: देशात चित्ते परतल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर; तुम्हीही पोट धरून हसाल!
चित्त्यांवरून बॉलिवूड मीम्सना उधाण
Image Credit source: Twitter
Follow us on

1952 मध्ये भारतातून चित्ता (Cheetah) नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं होतं. आता 70 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशात पुन्हा एकदा चित्ते आणले. शनिवारी आपल्या 72 व्या वाढदिवसानिमित्त मोदींनी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेले चित्ते सोडले. 70 वर्षांनंतर चित्ते देशात परतल्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रचंड आनंद व्यक्त केला. काहींनी त्यावरून बॉलिवूडशी संबंधित भन्नाट मीम्सही पोस्ट केले आहेत. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सोशल मीडियावर एका युजरने अक्षय कुमारच्या फोटोसह लिहिलं, ‘अक्षय कुमार चित्त्यांवर बायोपिक बनवण्याच्या तयारीत आहे.’ शेअर केलेल्या मीममध्ये अक्षय हा चित्त्याच्या प्रिंटचा शर्ट घातलेला दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

PIB इंडियाने चित्ता भारतात आणल्याबद्दल ट्विटद्वारे एक मीम शेअर केला आहे. PIB ने ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील जया बच्चन यांचं दृश्य शेअर केलं आहे. यामध्ये त्यांच्या हातात पूजेचं ताट दिसत आहे. चित्रपटात ज्यापद्धतीने त्या आपल्या मुलाची वाट पाहत असतात, त्याच पद्धतीने त्या चित्त्यांची वाट पाहत असल्याचं दाखवण्यात आलं.

आणखी एका युजरने धनुषच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटाची एक छोटी क्लिप शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये धनुष मिठाई वाटताना दिसत आहे. हा मीम पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल.

नामिबियाच्या चित्त्यांवर बाहुबली चित्रपटाचा मीमही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतात इतक्या वर्षांनंतर चित्ता परत आल्याने सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीही आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना कंगनाने लिहिलं, ‘पूर्वी कबूतर सोडले जात होते, आज आम्ही चित्ते आणले आहेत.’