AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सुव्रत आणि सारंग यांना पाहून तळपायाची आग मस्तकात गेली”,  छावा’मध्ये या मराठी अभिनेत्यांनी नेमकं असं काय केलंय?

'छावा' चित्रपटात विकीपासून ते औरंगजेबाची भूमिका साकारलेल्या अक्षय खन्नापर्यंत सर्वांचेच अभिनय प्रेक्षकांना आवडले आहेत. पण या चित्रपटात अनेक मराठी कलाकारही आहेत. ज्यात सर्वांच्याच महत्त्वाच्या भूमिका आहे. पण यातील सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये यांची मात्र फार चर्चा होत आहे. एका युजर्सने सोशल मीडियावर लिहिलं आहे की, "सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये यांना पाहून तळपायाची आग मस्तकात गेली" अशी कमेंट केली आहे. पण का?

सुव्रत आणि सारंग यांना पाहून तळपायाची आग मस्तकात गेली”,  छावा’मध्ये या मराठी अभिनेत्यांनी नेमकं असं काय केलंय?
| Updated on: Feb 16, 2025 | 2:32 PM
Share

छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाल्यापासून प्रत्येकाच्या ओठांवर फक्त याच चित्रपटाच नाव आणि कौतुक आहे. सिनेमा पाहून प्रेक्षक चांगलेच भारावून गेले आहेत. विकीने संभाजी महाराजांची साकारलेली भूमिका पाहून सर्वांनीच त्याचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचंही तेवढंच कौतुक केलं जात आहे.

दरम्यान या चित्रपटात विकीपासून ते औरंगजेबाची भूमिका साकारलेल्या अक्षय खन्नापर्यंत सर्वांचेच अभिनय प्रेक्षकांना आवडले आहेत. पण या चित्रपटात अनेक मराठी कलाकारही आहेत. ज्यात संतोष जुवेकर, आशिष पाथोडे, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये. या सर्वांच्या हत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये यांची चर्चा

मराठी कलाकारांच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी तेवढंच उचलून धरलं आहे. पण यातील सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये यांची मात्र विशेष चर्चा होताना दिसतेय. कारण त्यांनी साकारलेल्या नकारात्म भूमिका. सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये यांनी कान्होजी आणि गणोजी शिर्के या भूमिका साकारल्या आहेत. आणि त्यांच्याच फितुरीमुळे संभाजी महाराजांनी कैद करणे औरंगजेबाच्या सैन्यांना शक्य होतं.

मात्र या सीनमुळे सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये या अभिनेत्यांवर सोशल मीडियावर अनेक कमेंट्स येत आहेत, यातील एक कमेंट म्हणजे ‘यांना पाहून तळपायाची आग मस्तकात गेली’ अशी होती. त्याचं कारण आहे चित्रपटातील तो सीन.

सीन असा आहे….

छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याकडून संगमेश्वर येथे कैद केल्याचा सीन या चित्रपटात आहे. सीनमध्ये आंबाघाटाच्या मार्गाने औरंगजेबाच्या सैन्याला रात्रीच्या अंधारात वाट दाखवली जाते आणि त्याचं 5 हजारांचं सैन्य महाराजांना कैद करण्यासाठी चालून येतं असतं. यावेळी आंबाघाटाचा कठीण मार्ग मुघलांना कसा सापडला ही शंका संताजीच्या मनात निर्माण होते आणि यातूनच फितुरी झाल्याचं उघड होतं.

फितुरीमुळे संभाजी महाराजांना कैद करणं शक्य झालं 

महाराजांकडे केवळ 150 मावळे असतात. तर, दुसरीकडे औरंगजेब महाराजांना कैद करण्यासाठी तब्बल 5 हजारांचं सैन्य येत असतं. या लढाईत अंताजी, रायाजी असे सगळेजण आपले प्राण गमावतात. शेवटी कान्होजी आणि गणोजी शिर्के यांनी केलेल्या फितुरीमुळे शंभूराजेंना कैद करणं औरंगजेबाच्या सैन्याला शक्य होतं असा संपूर्ण प्रसंग दाखवण्यात आला आहे.

गणोजी शिर्के हे महाराणी येसूबाईंचे बंधू व छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे होते. याच गणोजींची भूमिका चित्रपटात सारंग साठ्ये साकारत आहे. तर, कान्होजींच्या भूमिकेत सुव्रत जोशी आहे.

“सुव्रत आणि सारंग यांना पाहून तळपायाची आग मस्तकात गेली”

सुव्रत जोशीने चित्रपटाबद्दलचे अनेक रिव्ह्यूज त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. यातल्या एका रिव्ह्यूमध्ये “सुव्रत आणि सारंग यांना पाहून तळपायाची आग मस्तकात गेली” असं लिहिण्यात आलं आहे. यावरून दोघांनाही त्यांनी साकारलेल्या भूमिकांची पोचपावती मिळाली आहे.

सारंग आणि सुव्रत यांच्या भूमिका शेवटपर्यंत ‘छावा’मध्ये मोठा सस्पेन्स निर्माण करणाऱ्या आहेत. औरंगजेबाला जाऊन नेमकं कोण मिळालंय, हे सिनेमात गुप्त ठेवलेलं आहे. शेवटी जेव्हा या दोघांचे चेहरे उघड होतात, तेव्हा आपल्याच माणसांनी फितुरी केल्याची भावना प्रत्येकाच्या मनात दाटून येते. यामुळे सध्या सुव्रत आणि सारंग यांनी साकारलेल्या भूमिकांची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.