
अभिनेता अक्षय कुमार याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या (FICCI) कार्यक्रमात अभिनेत्याने अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. अक्षय कुमार याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं, तुम्हाला महाराष्ट्रातील डार्क साईट माहीत आहे. राज्यात काय काय होतंय हे तुम्हाला माहीत आहे. सिनेमा क्राईमला कॉपी करत आहे की क्राईम सिनेमाला कॉपी आहे? यावर फडणवीस यांनी लक्षवेधी उत्तर दिलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आता क्राईम सिनेमाच्या पुढे गेला आहे. जोपर्यंत स्ट्रिट क्राईम होता. तेव्हा लोक स्ट्रिट क्राईममध्ये सिनेमे कॉपी करायचे. सिनेमात मोठा डाकू दिसला तर लोक तसं बनण्याचा प्रयत्न करत होते. आता सायबर क्राईमचा जमाना आहे. सायबर क्रिमिनल तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर हस्तगत करतात आणि क्राईम करतात. त्यामुळे त्यांनी आमच्यासमोर आव्हान उभं केलं आहे.
‘पण त्याचं उत्तरही तंत्रज्ञानातच आहे. आम्ही त्यावर काम करत आहोत. त्यामुळे सायबर क्राईमवर सिनेमे झाले पाहिजे. तसंच त्यात हिरो कसा शेवटी जिंकतो हे दाखवले पाहिजे. ज्या प्रकारे सायबर क्राईमचं आक्रमण होत आहे. आपली पोलीस फोर्स आहे. त्यात ओरिएन्टेशन चेंज करावा लागत आहे. आता प्रत्येक गोष्टीचा पुरावा मिळतो. पण डिजिटल क्राईम भयानक क्राईम आहे. आपल्या इंडस्ट्रीने त्यावर अजून काही दाखवलं नाही. त्यावर सिनेमा आला पाहिजे.
क्राईममध्ये जे गुन्हे घडत आहेत, ते पकडणं पोलिसांसाठी फार कठीण नाही. आता सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल, लोकेशन यामुळे स्ट्रिट क्राईम समोर येत आहेत. पण सायबर क्राईमध्ये ते शक्य नाही.. त्यामुळे सायबर क्राईमवर देखील सिनेमे आले पाहिजे असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
झेन जीबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मराठी फिल्म इतकी ताकदवर का आहे. कारण मराठी थिएटरने मराठी फिल्म शक्तीशाली केली. देशातील जे भाषिक थिएटर आहेत. ते कमी होताना दिसत आहे. पण मराठी थिएटर इनोव्हेटिव्ह राहिलं आहे. अभिव्यक्तीचं उदाहरण कायम ठेवलं आहे. मराठी प्रेक्षक व्हायब्रंट आहे. आजही मराठी नाटक हाऊसफुल्ल होतं. काही लोकांनी तर 10 हजार नाट्यप्रयोग करण्याचा विक्रम केला आहे. नटरंगसारखा सिनेमा आला. दशावतार सारखा सिनेमा आला. सखाराम बाइंडरचा शो होतो. त्याला झेन जी पसंत करत आहे. हा मराठी ऑडिअन्स आहे, तो सिनेमाला जोडला जात आहे. मराठीत क्रिएटिव्हीटी आहे.’