AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर नवरा बळजबरी करत असेल तर…, लोकप्रिय अभिनेत्रीचा 20 सेकेंदाचा व्हिडीओ थक्क करणारा

लग्नानंतर एका महिलेचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं... लग्नाआधी सुखी संसाराचे स्वप्न पाहण्याऱ्या मुलीच्या आयुष्यात काय होईल हे फक्त आणि फक्त तिच्या नशिबावर अवलंबून असते... आता देखील लोकप्रिय अभिनेत्रीचा 20 सेकेंदाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो थक्क करणारा आहे...

लग्नानंतर नवरा बळजबरी करत असेल तर..., लोकप्रिय अभिनेत्रीचा 20 सेकेंदाचा व्हिडीओ थक्क करणारा
दिव्या दत्ता
| Updated on: Feb 21, 2026 | 2:44 PM
Share

आई – वडील आपल्या मुलीला लाडात आणि प्रेमात वाढवतात, पण लग्नानंतर त्यांच्या मुलीच्या आयुष्यात काय लिहिलेलं आहे, हे फक्त आणि फक्त मुलीच्या नशिबावर असतं. लग्नाआधी मुली देखील सुखी संसाराचे स्वप्न पाहात असतात. पण लग्नानंतर काय होईल ते मुलीला देखील माहिती नसतं. अशाच सत्य परिस्थिती भोवती फिरणाऱ्या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सीरिजचं नाव ‘चिरैया’ असून त्यामध्ये मुख्य भूमिका अभिनेत्री दिव्या दत्ता हिने साकारलेली आहे… भारतीय घरात होणाऱ्या अन्यायावर सीरिजमध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. सीरिजचा टीझर फक्त 20 सेकेंदाचा आहे… पण खूप काही सांगून जात आहे.

एक नवीन नवरी… पूजा… चांगल्या आयुष्याचे स्वप्न पाहत असते. पण अचानक तिच्या आयुष्यात असं एक वळण येतं, जेव्हा तिच्या समोर एक भयानक परिस्थिती उभी राहते… त्यानंतर नवरी गच्चीत निराश आणि मोठ्या धक्क्यात दिसते… तिच्या डोळ्यात पाणी आणि शरीरावर जखमा दिसतात… जे पाहिल्यानंतर अभिनेत्रीला देखील मोठा धक्का बसतो…

काय आहे ‘चिरैया’ सिनेमाची कथा

सीरिजच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर, लग्नाच्या सोहळ्या मागचं वास्तव सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. सीरिज आसा प्रश्न उपस्थित करते की, लग्नानंतर पतीने आपल्या पत्नीवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणे योग्य आहे का? प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याचा अर्थ म्हणजे होकार असतो… असं नसतं… यावर खुद्द अभिनेत्रीने देखील स्वतःचं मत व्यक्त केलं आहे.

अभिनेत्री म्हणाली, ‘आम्ही कायम नातं टिकवण्यासाठी शांत राहतो… लग्नाला निर्विवाद संमती म्हणून स्वीकारलं जातं आणि त्यागाचं रोमँटिकीकरण केलं जातं जेणेकरून वेदना नाहीशा होतात.’ ही कथी आपल्याला विचार करायला भाग पाडते की आपण चुकीचं पाहिल्यानंतर गप्प राहावं की, जे योग्य आहे त्यासाठी आवाज उठवावा.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘चिरैया’

दिग्दर्शत शशांत शाह दिग्दर्शित ‘चिरैया’ सीरिजमध्ये दिव्या दत्ता हिच्यासोबत संजय मिश्रा, सिद्धार्थ शॉ, प्रसन्ना बिष्ट, फैसल राशिद, टीनू आनंद, सरिता जोशी यांसारखे सेलिब्रिटी आहेत. सीरिज लवकरत जियो हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?