Chor Nikal Ke Bhaga | हिऱ्यांची हेराफेरी, अजब हायजॅक; धमाकेदार आहे यामी-सनीचा ‘चोर निकल के भागा’ चित्रपट

या चित्रपटात यामी गौतम आणि सनी कौशलशिवाय शरद केळकरचीही भूमिका आहेत. सनी कौशल आणि यामी गौतमचं अभिनय प्रत्येक सीनमध्ये दमदार आहे. अजय सिंह यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून नेटफ्लिक्सवर तो प्रदर्शित झाला आहे.

Chor Nikal Ke Bhaga | हिऱ्यांची हेराफेरी, अजब हायजॅक; धमाकेदार आहे यामी-सनीचा 'चोर निकल के भागा' चित्रपट
चोर निकाल के भागाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 8:14 AM

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपटांची भर पडत असते. नुकताच यामी गौतम आणि सनी कौशल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘चोर निकल के भागा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अजय सिंह यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून नेटफ्लिक्सवर तो प्रदर्शित झाला आहे. हल्लीच्या चित्रपटांमध्ये कथेला अधिक महत्त्व आहे. संतुलित स्क्रिप्ट लिहिणं हे लेखकांसमोरही नवीन आव्हान आहे. प्रेक्षकांना कथेतील रंजक वळणं फार आवडतात आणि हेच ट्विस्ट – टर्न्स ‘चोर निकल के भागा’ चित्रपटात पहायला मिळतात.

काय आहे कथा?

या चित्रपटाच्या कथेत नाविन्य पहायला मिळतं. म्हणूनच प्रत्येक सीननंतर पुढे काय होणार, याचा अंदाज प्रेक्षक लावू शकत नाही. हीच या चित्रपटाची खास बात आहे. यामी गौतम ही सनी कौशलवर प्रेम करते, मात्र सनीच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो. यामीचा वापर करून तो त्याचं कर्ज फेडण्याच्या तयारीत असतो. यामीने चित्रपटात एअर होस्टेसची तर सनी कौशलने बिझनेसमनची भूमिका साकारली आहे. त्याच्यावर बरंच कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी तो यामीला फसवतो. दोघं मिळून हिऱ्याची चोरी करतात आणि सनीचा खरा चेहरा माहीत नसल्याने यामीसुद्धा त्याची मदत करते.

हे सुद्धा वाचा

सनी तिला फसवतोय हे जेव्हा यामीला कळतं तेव्हा ती त्याचा सूड घेण्याचं ठरवते. सनीविरोधात ती प्लॅनिंग करू लागते. दोघं मिळून आधी डायमंडची चोरी करतात. यामध्ये काही सरकारी कर्मचारीसुद्धा त्यांची मदत करतात. हिऱ्यांची चोरी आणि विमानाचं हायजॅक यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. त्याचसोबत ही सूड घेणाऱ्या महिलेचीही कथा आहे.

काय खटकतं?

यामी गौतम आणि सनी कौशलच्या या चित्रपटात रोमान्स आहे, गूढ आहे आणि बरीच रंजक वळणं आहेत. मात्र चित्रपटातील विनोदावर फारसं लक्ष दिलं गेलं नाही, हे स्पष्ट जाणवतं. चित्रपटातील दृश्यांना आणि सीन्सना अधिक रंजक बनवण्यासाठी विनोदाचा चलाखीने वापर महत्त्वाचा असतो. त्याचाच अभाव या चित्रपटात जाणवतो. त्याचसोबतच एकानंतर एक असे सीन्स सतत सुरू असल्याने प्रेक्षकांना विचार करण्यासाठी क्षणभर वेळ मिळत नाही. या चित्रपटाच्या संवादावरही आणखी काम करण्याची गरज आहे. ‘चोर निकल के भागा’च्या कथेवर सर्वाधित लक्ष दिल्याने संवाद कुठेतरी कमी पडताना दिसतात.

सकारात्मक बाजू

एकंतरीत हा चित्रपट वन टाइम वॉच आहे. मात्र त्यातील ट्विस्ट आणि टर्न्समध्ये तुम्ही मग्न होणार, याची विशेष काळजी दिग्दर्शकांनी घेतली आहे. हा चित्रपट पाहताना कुठेही रटाळवाणं किंवा कंटाळवाणं वाटणार नाही. या चित्रपटात यामी गौतम आणि सनी कौशलशिवाय शरद केळकरचीही भूमिका आहेत. सनी कौशल आणि यामी गौतमचं अभिनय प्रत्येक सीनमध्ये दमदार आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.