AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी बेडवर झोपलेली असताना दिग्दर्शकाने थेट… कोरिओग्राफरने सांगितला बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील भयंकर अनुभव, म्हणाली, पायाने…

नुकताच काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या 'टू मच' या चॅट शोमध्ये बोलताना फराह खान इंडस्ट्रीमध्ये महिलांना होणाऱ्या छळाबद्दल भाष्य केले. यावेळी धक्कादायक असा अनुभव सांगताना फराह खान दिसली.

मी बेडवर झोपलेली असताना दिग्दर्शकाने थेट... कोरिओग्राफरने सांगितला बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील भयंकर अनुभव, म्हणाली, पायाने...
Choreographer
| Updated on: Nov 06, 2025 | 8:35 AM
Share

गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड अभिनेत्री चित्रपटांच्या सेटवर आपल्यासोबत काय काय घडले हे सांगताना दिसतात. कधी चित्रपट निर्माताच अभिनेत्रीच्या रूममध्ये घुसून बळजबरी करतो तर कधी अभिनेता. आता नुकताच फराह खान हिने चित्रपटसृष्टीतील तिचा एक अत्यंत वाईट असा अनुभव सांगितला. कशाप्रकारे चित्रपट निर्माता तिच्या रूममध्ये शिरून बेडवर येऊन काय करत होता. वयाच्या 15 व्या वर्षापासून चित्रपटसृष्टीत फराह खान काम करते. अत्यंत वाईट परिस्थिती असताना फराह खानने काम करण्यास सुरूवात केली. कोरिओग्राफर म्हणून अनेक वर्षांपासून एक वेगळीच छाप फराह खानने सोडली आहे. बॉलिवूडमधील हा प्रवास नक्कीच इतका सोपा नव्हता, असे सांगताना फराह खान दिसली.

नुकताच काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या ‘टू मच’ या चॅट शोमध्ये बोलताना फराह खान इंडस्ट्रीमध्ये महिलांना होणाऱ्या छळाबद्दल सांगताना दिसली. फराह खान हिने सांगितले की, ती कोरिओग्राफर म्हणून काम करत असताना एका दिग्दर्शकाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तो थेट तिच्या रूममध्ये घुसला. फराह खान म्हणाली, मी झोपेत असताना तो गाण्यांवर किंवा काहीतरी चर्चा करण्यासाठी माझ्या खोलीत आला आणि माझ्या शेजारी बसला.

तो ज्यावेळी माझ्या शेजारी बसला होता, त्यावेळी मी झोपेत होते. मला त्याला तिथून हाकलून दिले. हेच नाही तर फराह खानने म्हटले की, त्यावेळी माझ्यासोबत ही घटना घडली, त्यावेळी तिथे ट्विंकल खन्ना देखील उपस्थित होती. यावर ट्विंकल  म्हणाली की, होय तो तिच्या मागे लागला होता. फराह खानने मोठा खुलासा करत म्हटले की, मी त्या व्यक्तीला लाथ घालून हाकलून दिले होते. काही वाईट अनुभव आल्याचेही सांगताना फराह खान दिसली.

पुढे बोलताना फराह खान म्हणाली की, मी माझ्या आयुष्यात इतका जास्त वाईट काळ बघितला आहे की, मी अजूनही काम करते. माझा वाईट काळ मला काम करण्यासाठी प्रेरित करतो. मी लहानपणी पैसे अजिबात बघितले नाहीत. मग मला वाटते की, मी प्रत्येक दिवशी काम करत राहिले तर माझ्या मुलांना पैशांची कमी होणार नाही. फराह खानने तिच्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष केला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...