3 आठवड्यांनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीची तुरुंगातून सुटका; तिच्या चेहऱ्यावर जखमा… आईच्या डोळ्यात पाणी
अंमली पदार्थांच्या तस्करीत प्रसिद्ध अभिनेत्री ३ आठवडे होती तुरुंगात.. लेकीच्या सुटकेनंतर आईच्या डोळ्यात पाणी... व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक..

मुंबई : ‘सडक २’ आणि ‘बाटला हाउस’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री क्रिसन परेरा (Chrisann Pereira) हिला दुबई येथील शाहजहा तुरुंगात कैद करण्यात आलं होतं. पण आता तब्बल तीन आठवड्यांनंतर अभिनेत्रीची सुटका झाली आहे.. अंमली पदार्थांच्या तस्करीत अभिनेत्रीचं नाव आल्यामुळे तिला अटक करण्यात आली. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात मला आडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला… असं क्रिसन परेरा म्हणाली. आता अभिनेत्रीची अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणातून सुटका झाली आहे. पण परदेशात बॉलिवूड अभिनेत्री तीन आठवडे कैद होती. परदेशातील तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी मोकळा श्वास घेतला आहे…
क्रिसन परेरा हिने तुरुंगातून बाहेर येताच आईसोबत संवाद साधला… लेकीला तुरुंगाबाहेर पाहिल्यानंतर आभिनेत्रीच्या आईला प्रचंड आनंद झाला.. सध्या अभिनेत्रीच्या घरात आनंदाचं वातावरण आहे… क्रिसन हिचा भाऊ केविने परेरा याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.. सध्या अभिनेत्रीच्या भावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे…
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीने अभिनेत्री तुरुंगातील दिवसांबद्दल एका पत्रात लिहिलं होतं.. पत्रात अभिनेत्री म्हणाली होती, ‘तुरुंगात पेन आणि पेपर मिळवण्यासाठी मला ३ आठवडे आणि ५ दिवस लागले. तुरुंगात मला सर्फने केस धुवावे लागले आणि मी टॉयलेटमधील पाण्यापासून कॉफी बनवली. मी बॉलिवूड सिनेमे पाहिले… अनेकदा माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आलं… मी अनेकदा आपलं कल्चर, सिनेमे आणि टीव्हीवरील कुटुंबपाहून हसली… भारतीय असल्याचा मला गर्व आहे… मी भारतील सिनेश्वातील एक भाग आहे…’
एका न्यूज पोर्टलला दिलेल्या माहितीनुसार, शारजाह विमानतळावर पोहोचल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी क्रिसन हिला ताब्यात घेतलं. अभिनोत्रीला ताब्यात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी तिच्या कुटुंबासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु केला.
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला अटक केल्यानंतर ७२ तासांनी अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी तिच्याबद्दल माहिती देण्यात आली. आता अभिनेत्रीची सुटका झाली आहे. एवढंच नाही तर ती भारतात परत कधी या प्रतीक्षेत अभिनेत्रीचे कुटुंबिय आणि चाहते आहेत.
