AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CID मधील डीसीपी चित्रोळे आठवतायत? एका भूमिकेनं जिंकलं प्रेक्षकांचं मन, आज अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते भावूक

CID Fame Actor : 'सीआयडी' या टीव्ही मालिकेत डीसीपी चित्राले यांची भूमिका साकारणारे अभिनेते आणि निर्माते बी. पी. सिंग यांचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यांचे चाहते खूप भावूक झाले आहेत.

CID मधील डीसीपी चित्रोळे आठवतायत? एका भूमिकेनं जिंकलं प्रेक्षकांचं मन, आज अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते भावूक
| Updated on: Oct 04, 2026 | 9:49 PM
Share

‘सीआयडी’ हा टीव्ही शो जरी बंद झाला असला तरी, त्याचा आणि त्यातील भूमिकांचा मोठा चाहतावर्ग आहे. या शोमधील क्लिप्स सोशल मीडियावर सतत व्हायरल होत आहेत. दया, अभिजीत आणि एसीपी प्रद्युमन यांच्या व्यतिरिक्त, या शोमध्ये अशी अनेक पात्रं होती जी लोकांच्या मनात खोलवर रुजलेली आहेत. असंच एक पात्र होतं ते म्हणजे डीसीपी चित्रोले.हे पात्र प्रत्येक एपिसोडमध्ये नव्हतं, पण जेव्हाही ते शोमध्ये दिसायचं, तेव्हा ते इतर पात्रांमध्ये भीती निर्माण करायचं आणि अनेकदा विनोद निर्माण व्हायचा.

डीसीपी चित्रोले यांचं पात्र शिस्तप्रिय, पण तरीही विनोदी होतं. ही भूमिका स्वतः ‘सीआयडी’चे निर्माते बी.पी. सिंग यांनी साकारली होती. बी.पी. सिंग ‘सीआयडी’च्या पहिल्या सीझनच्या अनेक एपिसोडमध्ये दिसले होते आणि या भूमिकेत ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र, आता बी.पी. सिंग यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे अनेक चाहते भावूक झाले आहेत.

‘पापनाशम’च्या सेटवर बी.पी. सिंग

दयाची भूमिका साकारणारे दयानंद शेट्टी त्यांच्या प्रोडक्शन कंपनीमार्फत ‘पापनाशम’ नावाचा एक नवीन क्राईम थ्रिलर शो घेऊन येत आहेत. अभिजीत (आदित्य श्रीवास्तव) आणि एसीपी प्रद्युमन (शिवाजी साटम) हे देखील या शोचा भाग असतील. नुकतीच शूटिंगला सुरुवात झाली आहे. मुहूर्ताच्या शॉटवेळी बी.पी. सिंग देखील उपस्थित होते.

बी.पी. सिंग यांचं वय

दयाने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शूटिंगमधील एक व्लॉग व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बी.पी. सिंग दिसत आहेत. बी.पी. सिंग आता जवळपास ७७ वर्षांचे आहेत. सीआयडीच्या पहिल्या सीझनच्या तुलनेत त्यांचा लूक खूप बदलला आहे. अनेक वर्षांनंतर त्यांना अशा रूपात पाहून चाहते भावूक झाले.

बी.पी. सिंग यांचे टीव्ही शो

बी.पी. सिंग यांनी केवळ सीआयडीच नाही, तर ‘आहट’, ‘गुट्टूर गन’, ‘सुपरकॉप्स व्हर्सेस सुपर व्हिलन्स’ आणि इतर अनेक टीव्ही शोची निर्मिती केली आहे. पण, त्यांनी सीआयडीमधील आपल्या अभिनयानेही अनेकांची मने जिंकली. चाहते ‘सीआयडी सीझन ३’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसली तरी, दया सीआयडीच्या कलाकारांसोबत ‘पापनाशम’ या स्वतःच्या शोमधून परत येत आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात