AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सलमानला फोन; सरकारकडून घटनेची गंभीर दखल

रविवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेची सरकारकडून गंभीर दखल घेतली गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून सलमानशी चर्चा केली.

गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सलमानला फोन; सरकारकडून घटनेची गंभीर दखल
सलमान खान, एकनाथ शिंदेImage Credit source: ANI
| Updated on: Apr 14, 2024 | 12:40 PM
Share

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा पुरविली जाणार आहे. त्याच्या घराबाहेरील सुरक्षासुद्धा वाढवली जाणार आहे. पोलिसांकडून युद्ध पातळीवर आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळेपूर्वीच फोनवरून सलमानशी बातचित केली. फोनवरून मुख्यमंत्र्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी 15 ते 20 पथकं तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दुसरीकडे या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. गृहमंत्री काय करत आहेत, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गोळीबाराच्या घटनेवर बोलताना राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्याबाबतची माहिती आम्हाला मिळेल. आम्हाला जेव्हा अधिक माहिती मिळेल, तेव्हा आम्ही देऊ. यात अटकळबाज्या करण्यात अर्थ नाही.”

नितेश राणे यांची प्रतिक्रिया

“हे महाविकास आघाडीचं सरकार नाही, जिथे उद्योजकांच्या घरासमोर जिलेटीन ठेवणार आणि मग सचिन वाझे त्याचा हिस्सा होणार. असं व्हायला हे काही उद्धव ठाकरे यांचं सरकार नाही. आम्ही जनतेला विश्वास देऊ इच्छितो की राज्यातल्या प्रत्येक नागरिकांची सुरक्षिततेची जबाबदारी आमची आहे,” असं नितेश राणे म्हणाले.

सलमानला सतत धमक्या

सलमान खानला अनेकदा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली. यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. इतकंच नव्हे तर स्वत: सलमानने अत्यंत महागडी बुलेटप्रूफ गाडीदेखील खरेदी केली होती. सलमानसोबत आणि त्याच्या वांद्रे इथल्या घराबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही रविवारी पहाटे धक्कादायक घटना घडली. सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर दोन अज्ञातांनी तीन राऊंड फायरिंग केली. गोळीबारानंतर आरोपी तिथून पळाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नाही.

Follow Us
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक