‘अश्लीलता नेहमीच…’ रामलीलामध्ये पूनम पांडे मंदोदरी साकारणाऱ्यावरून गोंधळ; लव कुश समितीचा मोठा निर्णय
रामलीलामध्ये पूनम पांडे मंदोदरी यांचे पात्र साकारणाऱ्यावरून गोंधळ निर्माण झाला होता. पूनम पांडे ने याआधी केलेल्या बोल्ड भूमिका पाहता तिने मंदोदरी यांची भूमिका साकारण्यास सर्वांनीच विरोध केला आहे. अखेर या विरोधामुळे लव कुश समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अलिकडेच, पूनम पांडे दिल्लीतील प्रसिद्ध लव कुश रामलीलामध्ये सामील झाल्याची घोषणा करण्यात आली. ती रावणाची पत्नी मंदोदरी यांची भूमिका साकारणार होती. पण त्याआधीच एक गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक संत आणि विश्व हिंदू परिषदेने (VHP) रामलीलेतील पूनम पांडेच्या सादरीकरणाचा निषेध केला आहे. लव कुश रामलीला समितीने यावर भूमिका घेत पूनम पांडेला भूमिकेतून काढून टाकले आहे.
लव कुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांचेही याबाबत एक विधान समोर आले आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याची इच्छा नाही. समिती आता पूनम पांडे यांना पत्र लिहून ही भूमिका करू नये अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पूनम पांडेला काढून टाकल्यानंतर लव कुश समितीच्या प्रतिक्रिया
त्यामुळे आता पूनम पांडे मंदोदरी यांची भूमिका साकारणार नसल्याचं समोर आलं आहे. धार्मिक भावना दुखावू नयेत म्हणून, समिती पूनम पांडेला पत्र लिहून तिला ही भूमिका साकारू नये अशी विनंती करणार आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “आमची इच्छा होती की तिने ही भूमिका साकारावी, कारण ती सकारात्मक होती, परंतु स्क्रीनिंग कमिटीने निर्णय घेतला आहे की पूनम पांडे ही भूमिका साकारू शकत नाही”
विश्व हिंदू परिषदेने निर्णयाचे स्वागत केले आहे
लव कुश रामलीला समितीने समाजाच्या भावना आणि पूज्य संतांच्या भावनांचा आदर करून यावर्षीच्या रामलीला कार्यक्रमात पूनम पांडेला आमंत्रित न करण्याचा निर्णय घेतला आणि विश्व हिंदू परिषदेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे की, “धर्माने नेहमीच शिष्टाचाराचे रक्षण केले आहे आणि अश्लीलता नेहमीच शिष्टाचाराचे उल्लंघन करते हे सर्वमान्य सत्य आहे. अश्लीलतेला शिष्टाचाराच्या एका टप्प्यावर पोहोचू देणे अयोग्य आहे.”
View this post on Instagram
अयोध्येतूनही निषेध करण्यात आला
दरम्यान यापूर्वी, अयोध्येच्या संतांनीही लव कुश समितीकडे अशी मागणी केली होती की पूनम पांडेचे वाद आणि तिने केलेलं काम लक्षात घेता, रामलीलेतील महत्त्वाच्या भूमिकेसाठी तिची निवड करणे अत्यंत चुकीचे आहे.
पूनम पांडेने भूतकाळातील बोल्ड भूमिकांमुळे महत्त्वाची भूमिका गमावली
त्यामुळे पूनम पांडे ज्यापद्धतीच्या बोल्ड भूमिका आजपर्यंत करत आली आहे त्याचा हा परिणाम असल्याच दिसून येत आहे आणि म्हणूनच लव कुश रामलीला समिती, विश्व हिंदू परिषदेने पूनम पांडेला मंदोदरी यांची भूमिका साकारण्यासाठी साफ विरोध दर्शवला आहे.
