AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिहा चक्रवर्ती हीला मोठा दिलासा, कोर्टाने दिले हे महत्वाचे आदेश

Sushant Singh Rajput Case:सुशांत सिंह राजपूत केसमध्ये एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या केसमध्ये रिया चक्रवर्ती हीला आणखी एक दिलासा मिळालेला आहे. याआधी सीबीआयने या प्रकरणातून तिला क्लीन चीट दिली होती.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिहा चक्रवर्ती हीला मोठा दिलासा, कोर्टाने दिले हे महत्वाचे आदेश
Sushant Singh Rajput case
| Updated on: Apr 26, 2026 | 8:15 PM
Share

Sushant Singh Rajput Case: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या केस संदर्भातील अंमलीपदार्थाशी संबंधित केस प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हीला मोठा दिलासा मिळाला आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हीची बँक खाती रिलीज करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि आई संध्या यांच्याशी संबंधित खाती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २०२० मध्ये गोठवली होती. मुंबईच्या एका स्पेशल नार्कोटिक्स ड्रग्ज एण्ड सायकोट्रोपिक सब्सटेंसेस (NDPS) कोर्टाने या खात्यांना अनफ्रीज करणे आणि त्यांना वापरण्याचा आदेश दिला आहे. सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड रिया हिला गेल्यावर्षी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशनने (CBI) या प्रकरणातून क्लीन चीट दिली आहे.

मुंबईच्या एका स्पेशल कोर्टाने अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि तिची आई संध्या चक्रवर्ती यांच्या अनेक बँक खात्यांना अनफ्रीज करण्यास परवानगी दिली आहे. या अकाऊंट्सना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने साल २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या चौकशी दरम्यान फ्रीज केले होते. मात्र, यातील काही खात्यांना २०२१ मध्ये अनफ्रीज केले होते.

रिया चक्रवर्ती हिला मोठा दिलासा

अलिकडेच कुटुंबाने ICICI, Axis आणि Kotak बँकेतील आपल्या काही आणखी अकाऊंटना वापरण्याची परवानगी द्यावी यासाठी पुन्हा कोर्टाची पायरी चढली होती. वकील अयाज खान आणि जेहरा चरनिया यांच्याद्वारे दाखल केलेल्या या अर्जात त्यांनी त्या खात्यांवर फोकस केले होते, जे परिवाराच्या सदस्यांचे जॉईंट अकाऊंट होते. रियाच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता की, एनसीबीने नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या कलम 68F च्या तरतुदींचे पालन केलेले नाही, त्यामुळे खाती सतत गोठवणे बेकायदेशीर ठरते.

कोर्टाने दिली ऑर्डर

या युक्तीवादाला ऐकल्यानंतर कोर्टाने रिया, तिचा भाऊ शोविक आणि आईशी संबंधित चार बँकेतील खाती अनफ्रीज करण्याचा आदेश दिला आहे. एनडीपीएस एक्ट अंतर्गत आवश्यक कायदेशीर प्रक्रीया वेळीच पूर्ण न झाल्याने खात्यांना फ्रीज करण्याची प्रक्रीया जारी होऊ शकली नाही.कोर्टाने देखील आदेश दिला की खात्यांना अनफ्रीज केले जावे आणि आरबीआयच्या निर्देशानुसार त्यांना सुरु करण्याची अनुमती दिली जावी.

Follow Us
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी,
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी, रक्तदान शिबिराचे आयोजन
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं