समय रैनाला दुसरा समन्स, कॉमेडियन का नाही राहत चौकशीसाठी उपस्थितीत? कारण समोर

Samay Raina: सध्याची परिस्थिती सांभाळणं माझ्यासाठी कठीण..., अडचणीत अडकल्यानंतर समय रैनाचं वक्तव्य, त्याला दुसऱ्यांदा बजावला समन्स, कॉमेडियन का नाही राहत चौकशीसाठी उपस्थितीत? कारण समोर

समय रैनाला दुसरा समन्स, कॉमेडियन का नाही राहत चौकशीसाठी उपस्थितीत? कारण समोर
| Updated on: Feb 14, 2025 | 9:40 AM

“इंडियाज गॉट लेटेंट” शोचा कर्ताधर्ता समय रैना वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आई – वडिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर समयच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कॉमेडियनला न्यायालयाने दुसऱ्यांदा समन्स बजावल आहे. कोर्टाने समय याला 17 फेब्रुवारीला उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादाप्रकरणी समय रैनाला महाराष्ट्र सायबर विभागाने दुसरा समन्स बजावला असून याप्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.

समय सध्या परदेशात असल्यामुळे त्याच्या वकिलांनी महाराष्ट्र सायबर विभागाकडे उपस्थित राहून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अवधी मागितला होता. पण सायबर विभागाने त्याला नकार देत 17 फेब्रुवारी रोजी समयला चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र सायबर विभागाने समय रैना, रणवीर अलाहबादियासह 30 जणांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. एवढंच नाही तर, YouTubeने समयच्या शोचे सर्व व्हिडीओ हटवले आहे. इन्फ्लुएंसर रणवीर अलाहबादिया याच्या एका वक्तव्यामुळे शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

 

 

घडलेल्या प्रकरणानंतर समय म्हणाला, ‘परिस्थिती सांभाळणं माझ्यासाठी कठीण होत आहे. मी माझ्या चॅनल वरुन ‘इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व एपिसोड डिलिट केले आहे. लोकांचं मनोरंजन करणं आणि त्यांना वेळ देणं एकवढाच एक माझा हेतू होता. मी सर्व यंत्रणांना पूर्ण सहकार्य करेन जेणेकरून त्यांचा तपास निष्पक्षपणे पूर्ण होईल. धन्यवाद…’ असं देखील समय म्हणाला.

समय याच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2019 मध्ये “कॉमिकस्तान”चा दुसरा सीझन जिंकल्यानंतर रैनाला प्रसिद्धी मिळाली. सध्या त्याचे इन्स्टाग्रामवर सहा दशलक्ष आणि यूट्यूबवर 7.45 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. समय सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो.