AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृतिका गायकवाड आता ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या मंचावर

'बंदिशाला' (Bandishala) या चित्रपटात जिने ठसकेबाज लावणी सादर केली, ती नृत्यांगना कृतिका गायकवाड (Krutika Gaikwad) आता 'झी युवा' (Zee Yuva) वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन'च्या (Yuva Dancing Queen Show) मंचावर आपल्या नृत्याचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

कृतिका गायकवाड आता 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावर
| Updated on: Dec 16, 2019 | 4:18 PM
Share

मुंबई : ‘बंदिशाला’ (Bandishala) या चित्रपटात जिने ठसकेबाज लावणी सादर केली, ती नृत्यांगना कृतिका गायकवाड (Krutika Gaikwad) आता ‘झी युवा’ (Zee Yuva) वाहिनीवरील ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या (Yuva Dancing Queen Show) मंचावर आपल्या नृत्याचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. त्याबाबत कृतिकाने ‘टीव्ही-9 मराठी’च्या टीमसोबत दिलखुलास गप्पा मारल्या.

‘तू ही रे’ (Tu Hi Re) चित्रपटातील, ‘गुलाबाची कळी’ (Gulabachi Kali) या गाण्यावर मी माझा पहिला परफॉर्मन्स देणार आहे. ‘बॉलिवूड स्टाईल’ने हे सादरीकरण मी करणार आहे. ही माझी आवडती शैली आहे आणि त्यामुळेच मला डान्स करणे सोपे सुद्धा जाईल. बंदिशाला सिनेमातील वैशाली आणि अमितराजच्या एका गाण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याच गाण्यावर पहिला परफॉर्मन्स असल्याचा मला खूप आनंद वाटतो आहे, अशी माहिती कृतिकाने तिच्या पहिल्या परफॉर्मन्सविषयी दिली.

विविध चित्रपटांमध्ये मी अनेक गाण्यांवर शूट केलेलं आहे. फुलवा खामकरने कोरिओग्राफ केलेल्या एका गाण्यात मी मयुरेश पेमसोबतसुद्धा काम केलेलं आहे. अर्थात, चित्रपटातील गाण्याचं चित्रीकरण आणि प्रेक्षकांची उपस्थिती असताना करण्यात येणारा परफॉर्मन्स यात खूपच फरक असतो. मंचावर, लाईव्ह परफॉर्मन्स करण्याचा माझा अनुभव मात्र बराच आधी घेतलेला आहे. हे आव्हान पेलण्याची संधी मिळणं, हे माझं मोठं भाग्य आहे. इथल्या मोठ्या मंचावर हे नवं आव्हान माझ्यासमोर असल्याने आनंद सुद्धा झालेला आहे. एक स्पर्धक असल्याने इतरांशी स्पर्धा असली, तरीही माझी पहिली स्पर्धा स्वतःशी असेल. माझ्यात अधिकाधिक सुधारणा व्हावी असा माझा प्रयत्न असेल, असंही तिने सांगितलं.

सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य हे ‘युवा डान्सिंग क्वीन’ स्पर्धेचे परिक्षक असणार आहेत. यांच्याविषयी बोलताना कृतिका म्हणाली की, ‘हे दोघेही माझे खूप लाडके आहेत. पण, एक भावनिक किस्सा मी नक्की सांगेन. मयूर सरांनी मला माझ्या दुसऱ्या सादरीकरणानंतर त्यांचे घुंगरू भेट म्हणून दिले. पंडित बिरजू महाराज यांच्याकडून त्यांना मिळालेले हे घुंगरू, त्यांनी मला भेट म्हणून दिले. हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा क्षण ठरला, हे मात्र नक्की’.

‘नृत्य सादर करताना, कधी कधी मनात भीती, धाकधूक ही असतेच. तर, कधीतरी मी अगदीच दिलखुलासपणे माझा डान्स परफॉर्म करते. त्यामुळे मनात भीती किंवा धाकधूक आहे अथवा नाही, असं काही स्पष्टपणे सांगता येणार नाही. त्या त्या दिवशीचा अनुभव निराळा असेल’, असं या स्पर्धेबाबत कृतिकाने सांगितलं.

‘उत्तमरित्या नृत्य सादर करण्याचा विचार आम्हा सर्व स्पर्धकांच्या मनात आहे. त्यामुळे, त्याचा मानसिक तणाव आणि दबाव असणं सहाजिक आहे. पण, आम्ही रिहर्सलदरम्यान वातावरण हलकंफुलकं ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. पूर्वा आणि नेहाचा यात मोठा सहभाग असतो. हसतखेळत, एकमेकांची थट्टामस्करी करत आम्ही नृत्याची तयारी सुद्धा करत असतो’, असंही कृतिकाने सांगितलं.

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.