डान्सर सपना चौधरीचा भाजपात प्रवेश

रियाणामधील सुप्रसिद्ध डान्सर आणि गायक सपना चौधरीने आज (7 जुलै) अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. सपनाने भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून पक्षात प्रवेश केला आहे.

डान्सर सपना चौधरीचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : हरियाणामधील सुप्रसिद्ध डान्सर आणि गायक सपना चौधरीने आज (7 जुलै) अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला. सपनाने भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून पक्षात प्रवेश केला आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडिअयमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजपा महासचिव रामलाल आणि दिल्लीचे भाजप प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून सपना चौधरी भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. पण आता अधिकृतपणे सपनाने भाजपात प्रवेश केला आहे. सपनाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपचा प्रचारही केला होता. विधानसभा निवडणुकांपूर्वी सपनाने भाजपात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान ऑक्टोबर 2019 पर्यंत हरियाणात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे हरियाणा मतदारसंघातून भाजप सपना चौधरीला तिकीट देणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी सपना चौधरीचा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधीसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. यावरुन सपना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सुरु होती. पण या चर्चांना पूर्णविराम देत, सपनाने आज भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेलाही तिने खोटे ठरवले आहे.

सपना चौधरी हरियाणातील सुप्रसिद्ध गायक आणि डान्सर आहे. बॉलिवूडच्या चित्रपटात तिने आयटम साँग केले आहेत.  तसेच ती बिग बॉसमध्येही येऊन गेली आहे. याशिवाय ती काही चित्रपटातही दिसणार असल्याचेही सांगितलं जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *