Deepika Padukone | दीपिका पदुकोणची भूटान ट्रिप ठरतेय हिट; तुम्ही गेलात तर करू नका ही 4 कामं

| Updated on: Apr 16, 2023 | 4:45 PM

भूटानमधल्या निसर्गसौंदर्यापासून, संस्कृती आणि खाद्यपदार्थांपर्यंतचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

1 / 9
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकाला 'मी टाइम'ची फार गरज असते. मग तो सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी.. विविध ठिकाणी फिरायला जाणं, नवनव्या गोष्टी पाहणं अनेकांना आवडतं. अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून भूटानला फिरायला गेली आहे.

2 / 9
या भूटानची ट्रिपची झलक ती फोटोंद्वारे चाहत्यांना दाखवत आहे. दीपिकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर भूटान ट्रिपचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. तुम्हीसुद्धा भूटानची ट्रिप प्लॅन करत असाल तर या चार गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा.

3 / 9
भूटान हा तंबाखू विरहित देश आहे आणि इथे धूम्रपान करण्यावर बंदी आहे. इथे तुम्हाला असा एखादाही दुकान दिसणार नाही, जिथे सिगारेट विकली जात असेल. त्यामुळे भूटानमध्ये तुम्ही स्मोकिंग करू शकत नाही.

4 / 9
भूटानमध्ये फिरताना बुद्धांविषयी काहीही चुकीचं बोलणं तुम्हाला महागात पडू शकेल. त्यामुळे तिथल्या संस्कृतीला नावं ठेवू नये.

5 / 9
भूटानमध्ये नद्यांना फार पवित्र मानलं जातं. जर कोणी नदीच्या पाण्यात दगड फेकताना दिसला तर तो अडचणीत सापडू शकतो. इतकंच नाही तर तुम्हाला तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो.

6 / 9
भूटानमध्ये ड्रोन उडवण्यावर बंदी आहे. म्हणूनच इथे ड्रोन शूट करताना दिसलात तर तुम्हाला तुरुंगात डांबलं जाऊ शकतं.

7 / 9
'पठाण' या चित्रपटाच्या यशानंतर दीपिकाने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं. त्यानंतर पुढील शूटिंग सुरू करण्याआधी दीपिकाने स्वत:साठी ब्रेक घेतला आणि भूटानला फिरायला गेली.

8 / 9
भूटानमधल्या निसर्गसौंदर्यापासून, संस्कृती आणि खाद्यपदार्थांपर्यंतचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

भूटानमधल्या निसर्गसौंदर्यापासून, संस्कृती आणि खाद्यपदार्थांपर्यंतचे सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

9 / 9
तिथल्या मुलांसोबतचा दीपिकाचा फोटो..

तिथल्या मुलांसोबतचा दीपिकाचा फोटो..