
बॉलिवूडमधीस पॉवरफुल कपल म्हणजे अभिनेत्री दीपिका पडूकोण आणि अभिनेता रणवीर सिंग. सध्या ते दोघं तर चर्चेत आहेत, पण त्याहून जास्त चर्चा होत्ये ती त्यांची लाडकी लेक ‘दुआ’ हिची. काल दिवाळीच्या मुहूर्तावर दीपिका-रणवीरने काही फोटो शे्र करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ते फोटो पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसला, कारण त्या फोटोत रणवीर आणि दीपिकासोबत त्यांची वर्षभराची गोड लेक दुआ ही देखील होती. 8 सप्टेंबर 2024 ला जन्माला आलेल्या दुआचा चेहरा पहिल्यांदाच सर्वांसमोर आला असून तिचं गोड हास्य, क्यूटनेस यावर लोकांच्या लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.
सोशल मीडियावर शेअर केले फोटो
दीपिकाने काल तिच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो पोस्ट केले. ज्यामध्ये रणवीर आणि दीपिका त्यांच्या मुलीकडे प्रेमाने पाहत आहेत. फोटोमध्ये रणवीर आपल्या मुलीला कुशीत घेऊन हसतो आणि दीपिका तिच्याकडे प्रेमाने पाहत आहे. दुआच्या निरागस हास्याने अनेक चाहत्यांचे मन जिंकलं. एका फोटोत ती आई दीपिकाच्या मांडीत बसून काहीतरी लक्षपूर्वक पाहतानाही दिसत्ये. या फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा अगदी वर्षाव झाला आहे. रणवीर-दीपिकाची ही गोड लेख वर्षभराची आहे, पण ती आत्ताच करोडोंची मालकीण आहे. जाणून घेऊया नेटवर्थ
दीपिका-रणवीरची एकूण संपत्ती
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे दोघेही बॉलिवूडमधील सुपरस्टार आहेत. त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त, दोघांनी जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यवसाय गुंतवणुकीतून लाखोंची कमाई केली आहे. रणवीर सिंगने 2010 साली ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानतंर त्याने अनेक हिट चित्रपट दिले. तो त्याची अनोखी फॅशन आणि एनर्जीसाठीही प्रसिद्ध आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रणवीरची एकूण संपत्ती अंदाजे 415 कोटी रुपये आहे.
तर अभिनेत्री दीपिका पदुकोण ही भारतातील सर्वात महागड्या आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. ती केवळ चित्रपटांमधून पैसे कमवतेच असं नव्हे तर एका जाहिरातीसाठी ती 8 कोटींपर्यत फी आकारते. अनेक मोठ्या ब्रँड्सची अँबेसेडर म्हणून काम करणाऱ्या दीपिकाने अनेक फॅशन आणि हेल्थ स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती 900 कोटींपेक्षा जास्त आहे.
रणवीर आणि दीपिका यांची एकत्रित संपत्ती अंदाजे 1315 कोटी आहे. त्यांची एक वर्षाची मुलगी, दुआ, या प्रचंड संपत्तीची वारस बनली आहे.