AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan Third Marriage : जेव्हा कधी कुठला मुसलमान असं करतो, तेव्हा..आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर देवबंदी उलेमांचं मोठं वक्तव्य

Aamir Khan Third Marriage : आमिर खानचं पहिलं लग्न रिना दत्ता बरोबर झालं. त्या लग्नापासून त्याला दोन मुलं आहेत. आमिर खानच्या मुलीचं सुद्धा लग्न झालं आहे. किरण राव बरोबर दुसरं लग्न केलं. तिच्यापासून आमिरला एक मुलगा आहे आणि आता तिसरं लग्न केलं.

Aamir Khan Third Marriage : जेव्हा कधी कुठला मुसलमान असं करतो, तेव्हा..आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर देवबंदी उलेमांचं मोठं वक्तव्य
Aamir Khan Third Marriage
| Updated on: Jul 14, 2026 | 3:00 PM
Share

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने नुकतचं तिसरं लग्न केलं. या तिसऱ्या लग्नावरुन बराच वाद सुरु आहे. यावरुन वेगवेगळी मतं मांडली जातायत, चर्चा सुरु आहेत. या सगळ्यात प्रसिद्ध देवबंदी उलेमा मौलाना कारी इसहाक गोरा यांचं वक्तव्य चर्चेत आहे. या लग्नावर आक्षेप घेणाऱ्यांना त्यांनी बरच काही सुनावलं आहे. कुठल्याही बाबतीत दुटप्पी निकष योग्य नाहीत. ‘मियां-बीवी राज़ी, तो क्या करेगा क़ाजी?’ असं त्यांनी टिपिकल वाक्य म्हटलं आहे. आमिर खानचं पहिलं लग्न रिना दत्ता बरोबर झालं. त्या लग्नापासून त्याला दोन मुलं आहेत. आमिर खानच्या मुलीचं सुद्धा लग्न झालं आहे. किरण राव बरोबर दुसरं लग्न केलं. तिच्यापासून आमिरला एक मुलगा आहे आणि आता तिसरं लग्न केलं.

“जर, एखादा प्रौढ व्यक्ती आपल्या मर्जीने आणि कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेत असेल, तर गरजेचं नाहीय की, प्रत्येक व्यक्तीने त्यावर आपलं मत मांडावं. जेव्हा कधी कुठला मुसलमान असं करतो, तेव्हा त्याच्यावर वेगवेगळे आरोप लावले जातात. इतकच काय, लव्ह जिहाद सारखे वाद जोडण्याचाही प्रयत्न होतो. हेच काम जेव्हा दुसऱ्या समाजातील व्यक्ती करतो, तेव्हा त्याला प्रेमाचा मुलामा दिला जातो. प्रेमासमोर जातीच्या भिंती तुटल्या असं म्हटलं जातं” असं मौलाना कारी इसहाक गोरा यांनी म्हटलं आहे.

वाद निर्माण करण्याची काय गरज आहे?

मौलाना कारी इशहाक गोरा यांनी लोकांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. “आपल्या विचारात दुटप्पीपणा का आहे?. दुसऱ्यांच्या विषयात हस्तक्षेप करुन वाद निर्माण करण्याची काय गरज आहे?. देशासमोर शिक्षण, बेरोजगारी, महागाई, सामाजिक सद्भाव आणि प्रगती असे अनेक मुद्दे आहेत. आपण त्या विषयांना महत्व दिलं पाहिजे, जे समाज आणि देशासाठी खऱ्या अर्थाने फायद्याचे आहेत” असं मौलाना कारी इशहाक गोरा म्हणाले.

कुठलाही भेदभाव करु नये

मौलाना क़ारी इसहाक गोरा म्हणाले की, “कुठल्याही विषयावर न्यायपूर्ण आणि सारखाच दृष्टीकोन ठेवणं हे न्याय आणि सभ्य समाजाचं लक्षण आहे. समाजाने अशा बाबतीत कुठलाही भेदभाव करु नये” आमिर खानने 5 जुलै रोजी एका खासगी समारंभात गौरी स्प्रॅटसोबत तिसरं लग्न केलं. या लग्नामध्ये आमिरच्या दोन पूर्व पत्नी रीना दत्ता आणि किरण राव सुद्धा सहभागी झाल्या होत्या.

Follow Us
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...