AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब, वडिलांचा 800 कोटींचा आलिशान राजवाडा, तरीही अभिनेत्री बॅंकेत नोकरी करायची अन् भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती

ही अभिनेत्री एका मोठ्या बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंक कुटुंबातील आहे. या अभिनेत्रीच्या वडिलांचा 800 कोटींचा आलिशान पॅलेस म्हणजे राजवाडा आहे. तरी देखील अभिनेत्री होण्याआधी घरच्यांकडून पैसे न घेता ती बँकेत नोकरी करून आपला खर्च भागवत असे आणि ती 17 हजार रुपये देऊन भाड्याच्या घरात राहत होती. कोण आहे ही अभिनेत्री?

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब, वडिलांचा 800 कोटींचा आलिशान राजवाडा, तरीही अभिनेत्री बॅंकेत नोकरी करायची अन् भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती
Soha Ali Khan lived in a rented house of Rs 17,000Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2025 | 2:47 AM
Share

बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री जी बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबातील आहे. वडिलांची करोडोंची संपत्ती, 800 कोटींचा आलिशान पॅलेस असतानाही ही अभिनेत्री मुंबईत 17 हजार रुपये भाडे देऊन एका फ्लॅटमध्ये राहत होती. तसेच ही अभिनेत्री स्वत: देखील उत्तम अभिनेत्री आहे. पण अभिनेत्री होण्याआधी आणि वडिलांची एवढी संपत्ती असतानाही ही अभिनेत्री एका बॅंकेत काम करत होती. कारण तिला कोणाकडून पैसे मागावे लागू नये यासाठी ती नोकरी करत होती. कोण आहे ही अभिनेत्री चला जाणून घेऊयात.

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंबातील मुलगी

आपण ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती आहे सोहा अली खान. होय, मन्सूर अली खान पतौडी यांची मुलगी आणि प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानची बहीण. मन्सूर अली खान पतौडी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. तसेच ते मन्सूर अली खान पतौडी हे पतौडी राज्याचे 9 वे नवाब होते.

आई देखील दिग्गज अभिनेत्री

सोहाची आई देखील दिग्गज अभिनेत्री आहेत. तिचा पती कुणाल खेमू, भाऊ आणि वहिनी करीना यासर्वांचाच बॉलिवूडशी संबंध आहे. मन्सूर अली खान पतौडी आता या जगात नाहीत. पण त्यांची संपत्ती मात्र अफाट आहे. त्यांचा 800 कोटी रुपयांचा पॅलेस आहे . हा पॅलेस आता सैफ अली खानच्या मालकीचा आहे.

17 हजार रुपये देऊन भाड्याच्या घरात का राहिली अभिनेत्री?

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान सोहा अली खानने स्वतः खुलासा केला की ती भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. तिने यामागील कारणही सांगितले. सोहा जेव्हा भाड्याच्या घरात राहत होती तेव्हा तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. तिचे कुटुंब पैशापासून ते लोकप्रियतेपर्यंत सर्व बाबतीत श्रीमंत होते. अभिनेत्री होण्यापूर्वी सोहा एका बँकेत काम करत होती.

View this post on Instagram

A post shared by Soha (@sakpataudi)

अभिनेत्री बँकेत काम करत होती 

सोहाने सांगितले की ती मुंबईतील लोखंडवाला येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. येथे अभिनेत्री दरमहा 17 हजार रुपये देत असे. ती म्हणाली, “मला स्वतंत्र जीवन जगायचं होतं. मला स्वतः पैसे कमवायचे होते, जेणेकरून मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकेन. जेणेकरून मला दुसऱ्या कोणाचेही ऐकावे लागू नये.” सोहाने जेव्हा तिला बँकेत नोकरीला होती तेव्हा तिला दरवर्षी 2 लाख 20 हजार रुपये मिळत होते. म्हणजेच ती तिच्या पगाराचा जवळजवळ सर्व भाग भाड्यावर खर्च करत असे.

चित्रपटांमध्ये करिअर करायचे होते

सोहा पुढे म्हणाली, “नोकरी करण्याचा निर्णय माझ्यासाठी नंतर कामी आला. कारण मी 17 हजार रुपये भाडे देत होते, मला बँकेत नोकरी मिळाली होती. पण नंतर मला चित्रपटांमध्ये करिअर करायचे होते आणि मला माहित होते की माझे पालक कदाचित त्या निर्णयावर नाराज असतील. पण मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकते कारण मी स्वतः कमवत होते.”

सोहाने फार कमी चित्रपट दिले असले तरी लक्षात राहण्यासारखे आहे, तसेच तिने कुणालसोबत लग्न केल्यानंतर चित्रपटांपासून अंतर ठेवले आणि पूर्णपणे तिचा वेळ हा तिचे लग्न , घर आणि नंतर तिची मुलगी यांना दिला. आता ती हळूहळू पुन्हा बॉलिवूड,वेब सीरिजमध्ये काम करताना दिसत आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.