AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devoleena Bhattacharjee: ‘गोपी बहू’ला लागली हळद; देवोलीना भट्टाचार्जी लग्नबंधनात अडकणार?

'गोपी बहू'च्या लग्नाची धूम? हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो आले समोर

Devoleena Bhattacharjee: 'गोपी बहू'ला लागली हळद; देवोलीना भट्टाचार्जी लग्नबंधनात अडकणार?
देवोलीना भट्टाचार्जीImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 14, 2022 | 9:26 AM
Share

गुवाहाटी: सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. अशातच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ‘गोपी बहू’ म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी लग्नबंधनात अडकणार असल्याचं समजतंय. देवोलीनाच्या चाहत्यांसाठी ही थोडी आश्चर्याची बातमी आहे. कारण गेल्या काही दिवसांत तिच्या लग्नाविषयी कोणतीच चर्चा नव्हती. मंगळवारी अचानक तिला हळद लागल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले.

देवोलीनाच्या लग्नाविषयीची चर्चा झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी अनेकदा ती लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र तेव्हा कोणतेच फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले नव्हते. आता सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओंमध्ये देवोलीनाला हळद लागल्याचं पहायला मिळत आहे. तिचा खास मित्र विशाल सिंह तिला हळद लावत असल्याचा एक फोटो आहे.

देवोलीनाच्या हातात काही भेटवस्तू आहे आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट पहायला मिळतोय. देवोलीनाने होणाऱ्या वधूप्रमाणेच हातात बांगड्या, डोक्यावर मांग टीका आणि हातात बऱ्याच अंगठ्या घातल्या आहेत. मात्र या फोटो आणि व्हिडीओंमागील सत्य अद्याप समोर आलेलं नाही.

देवोलीनाने अद्याप तिच्या लग्नाची घोषणा केली नाही. मात्र तिच्या मेकअप आर्टिस्टने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिचा उल्लेख आवर्जून केला आहे. मेकअप आर्टिस्टने इन्स्टा स्टोरीमध्ये देवोलीनाचा फोटो शेअर करत लिहिलं, ‘ब्राइड’ (नवरी). त्यामुळे देवोलीना खरंच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातंय.

आता चाहत्यांना हा प्रश्न पडलाय की देवोलीना कोणाशी लग्न करणार आहे? याआधी देवोलीना आणि विशालचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो तिला प्रपोज करताना दिसला होता. मात्र हे दोघं एका म्युझिक व्हिडीओचं प्रमोशन करत होते, हे नंतर स्पष्ट झालं.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.