Gadar 2 | ‘गदर 2’च्या प्रीमिअरला हेमा मालिनी यांना डावललं? धर्मेंद्र यांच्यासोबत पोहोचल्या पहिल्या पत्नी

'गदर 2'च्या प्रीमिअरला सनी देओलचा भाऊ बॉबी देओल आणि त्याची पत्नी तान्यासुद्धा हजर होते. यावेळी दोघांनी एकत्र पापाराझींसाठी पोझ दिले. देओल कुटुंबाव्यतिरिक्त इंडस्ट्रीतून जॅकी श्रॉफ, अदिती गोवित्रीकर, नाना पाटेकर, सुभाष घई यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Gadar 2 | 'गदर 2'च्या प्रीमिअरला हेमा मालिनी यांना डावललं? धर्मेंद्र यांच्यासोबत पोहोचल्या पहिल्या पत्नी
Dharmendra, Hema Malini and Prakash KaurImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 2:39 PM

मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : अभिनेता सनी देओलचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘गदर 2’ हा चित्रपट शुक्रवारी (11 ऑगस्ट) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचं पहायला मिळत आहे. तब्बल 22 वर्षांनंतर ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शुक्रवारी मुंबईत सेलिब्रिटींसाठी ‘गदर 2’च्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रीमिअरमध्ये सनी देओलची आई आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. प्रकाश कौर या नेहमी लाइमलाइटपासून दूर राहतात. किंबहुना आपल्या मुलाच्या चित्रपटाच्या प्रीमिअरला हजेरी लावण्याची त्यांची ही पहिलीच वेळ असावी.

प्रकाश कौर यांच्यासोबत धर्मेंद्रसुद्धा या प्रीमिअरला उपस्थित होते. यावेळी दोघांनी एकत्र पोझ दिले नाहीत. तर कार्यक्रमालाही दोघं वेगवेगळे आले होते. याआधी सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नात धर्मेंद्र आणि प्रकाश कौर बऱ्याच वर्षांनंतर एकत्र दिसले होते. यावेळी दोघांनी कौटुंबिक फोटोसाठी एकत्र पोझसुद्धा दिले होते.

हे सुद्धा वाचा

करिअरच्या शिखरावर असताना हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. त्यावेळी धर्मेंद्र विवाहित आणि चार मुलांचे पिता होते. हेमा आणि धर्मेंद्र यांनी 1980 मध्ये लग्नगाठ बांधली. 1981 मध्ये हेमा यांनी ईशाला जन्म दिला तर 1985 मध्ये अहानाचा जन्म झाला. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल ही दोन मुलं आणि विजीता- अजीता या दोन मुली आहेत.

View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

‘गदर 2’च्या प्रीमिअरला सनी देओलचा भाऊ बॉबी देओल आणि त्याची पत्नी तान्यासुद्धा हजर होते. यावेळी दोघांनी एकत्र पापाराझींसाठी पोझ दिले. देओल कुटुंबाव्यतिरिक्त इंडस्ट्रीतून जॅकी श्रॉफ, अदिती गोवित्रीकर, नाना पाटेकर, सुभाष घई यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

‘गदर 2’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. त्यामुळे पहिल्या दिवशीच या चित्रपटाने दमदार कमाई केली. शुक्रवारी सनी देओल आणि अमीषा पटेलच्या या चित्रपटाने तब्बल 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर दुसरीकडे याच दिवशी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ या चित्रपटाने फक्त 9.5 कोटी रुपये कमावले.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.