Dharmendra Health Update : धर्मेंद्र यांची प्रकृती कशी? तो फोटो व्हायरल, शत्रुघ्न सिन्हा पोहोचले अभिनेत्याच्या घरी

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मागील काही दिवसांपासून रूग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांच्यावर घरी उपचार सुरू असून तब्येत सुधारत असल्याची माहिती मिळतंय. नुकताच शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या घरी पोहोचले.

Dharmendra Health Update : धर्मेंद्र यांची प्रकृती कशी? तो फोटो व्हायरल, शत्रुघ्न सिन्हा पोहोचले अभिनेत्याच्या घरी
Dharmendra
| Updated on: Nov 18, 2025 | 11:24 AM

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांच्यावरील उपचार त्यांच्या घरीच सुरू आहेत. धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल विविध अफवा रंगताना दिसल्या. घरी जरी उपचार सुरू असले तरीही धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक आहे. डॉक्टरांकडून सर्व प्रयत्न केली जात आहेत. धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी काही दिवसांपूर्वीच आता सर्वकाही देवाच्या हातात असल्याचे म्हटले. धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनीही धर्मेंद्र यांचे घर गाठले आणि त्यांची भेट घेतली. धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा खूप चांगले मित्र आहेत. खास मैत्री दोघांमध्ये अनेक वर्षांपासून आहे.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी हेमा मालिनी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली. शत्रुघ्न सिन्हा यांनी एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यांनी खास कॅप्शनही दिले. यावेळी अभिनेते धर्मेंद्र यांच्या तब्येतीचे अपडेट देखील दिले. आमच्या मोठ्या भावाच्या आणि कुटुंबीयांच्या आरोग्याची विचारपूस केली, असे त्यांनी म्हटले. धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर असल्याचीही माहिती मिळतंय.

हेल्थ अपडेटनुसार, धर्मेंद्र यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळतंय. धर्मेंद्र यांची मुले आणि कुटुंबिय त्यांच्या आसपासच असून त्यांची काळजी घेत असल्याची माहिती मिळतंय. बुधवारी सकाळी 12 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. घरी उपचार सुरू असून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले, त्यानुसार, त्यांची प्रकृती सुधारत आहे.

धर्मेंद्र यांच्या घराबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली. सर्व कुटुंब सध्या त्यांच्यासोबत आहे. धर्मेंद्र उपचाराला प्रतिसाद देत असल्याचाही माहिती मिळतंय. त्यामध्येच आता शत्रुघ्न सिन्हा यांनी हेमा मालिनींची भेट घेतली असून धर्मेंद्र यांच्या तब्येतीची विचारपूस केली. धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा चांगले मित्र असून त्यांच्यामध्ये फूट टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले होते.