AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra : काहीही कर मला तिच्याकडे घेऊन चल…, धर्मेंद्र यांची शेवटची इच्छा अपूर्णच

Dharmendra Death : धर्मेंद्र यांची साधी इच्छा शेवटच्या क्षणी राहिली अपूर्णच, म्हणालेले, 'काहीही कर मला तिच्याकडे घेऊन चल...', धर्मेंद्र यांच्या निधनामुळे कुटुंबियांसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे... सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या शेवटच्या इच्छेची चर्चा...

Dharmendra : काहीही कर मला तिच्याकडे घेऊन चल..., धर्मेंद्र यांची शेवटची इच्छा अपूर्णच
Dharmendra
| Updated on: Dec 07, 2025 | 10:09 AM
Share

Dharmendra Death : आपल्या जवळच्या व्यक्तीने व्यक्त केलेली इच्छा आपल्याकडून पूर्ण झाली तर, त्यातून मिळणारा आनंद फार मोलाचा असतो… पण ती इच्छा त्या व्यक्तीची शेटवची इच्छा ठरली तर… असंच काही धर्मेंद्र यांच्यासोबत देखील झालं आहे. बॉलिवूडचे लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल अशा काही गोष्टी समोर आल्या, ज्यामुळे तुमच्या देखील डोळ्यात पाणी येईल.

आता धर्मेंद्र यांची शेवटची इच्छा काय होती, याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्याकडे धर्मेंद्र यांनी शेवटची इच्छा व्यक्त केली होती. अनिल म्हणाले, धर्मेंद्र यांची एक इच्छा होती, जी आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाही…

एका मुलाखतीत अनिल शर्मा यांनी धर्मेंद्र यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितलं आहे. ‘मी बॉबी देओल याच्या घरी गेलेलो.. तेव्हा धर्मेंद्र तिथे बसलेले होते आणि त्यांना भेटण्यासाठी अनेक जण येत – जात होते… ते मला देखील भेटले आणि त्यांनी मला मिठी मारली… आणि मला विचारलं देखील सध्या काय करत आहेस… त्यानंतर त्यांनी माझ्याकडे एक विनंती केली…’

‘धर्मेंद्र मला म्हणाले अनिल मला एक चांगली भूमिका दे… मला आज देखील काम करायचं आहे.. कॅमरा माझी प्रियसी आहे… ती मला बोलवत आहे … मला तिच्याकडे जायचं आहे… काहीही कर पण मला चांगली भूमिका दे… माझ्यासाठी एक चांगली भूमिका लिही….’ पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली…

पुढे अनिल म्हणाले, ‘धर्मेंद्र यांनी मला तीन वेळी सांगितलं… मी देखील त्यांना वचन दिलं की, तुमच्यासाठी भूमिका लिहिणार… पण काही महिन्यात असं काही होईल याचा विचार देखील केला नव्हता… ती शेवटची संध्याकाळ माझी त्यांच्यासोबत… मला असं वाटलं की ते 90 वर्ष जगतील… त्यांचं कॅमेऱ्यावर प्रेम होतं, त्यांनी कधीच त्याचा व्यवसाय केला नाही…’ असं देखील अनिल म्हणाले.

अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन…

अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला. घरी आल्यानंतर कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसाची तयारी देखील सुरु केली. पण 24 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांनी  अखेरचा श्वास घेतला…

Follow Us
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना