AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’ मध्ये अतीक अहमद… दाऊद इब्राहिम आणि नोटबंदीचा कट…, नेमकं कनेक्शन काय?

Dhurandhar 2: 'धुरंधर 2' सिनेमातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी... अतीक अहमद याचा काळा कारभार... बेडवर पडलेल्या दाऊद इब्राहिमचे भारताविरोधात कट आणि नोटबंदी... जाणून घ्या नेमकं कनेक्शन काय?

Dhurandhar 2: 'धुरंधर 2' मध्ये अतीक अहमद... दाऊद इब्राहिम आणि नोटबंदीचा कट..., नेमकं कनेक्शन काय?
Dhurandhar 2
| Updated on: Mar 22, 2026 | 9:59 AM
Share

Dhurandhar 2: अभिनेता रणवीर सिंग दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ सिनेमाचंच वातावरण सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे… सिनेमाची कथा नक्की कोणत्या गोष्टींभोवती फिरत आहे… हे समोर आलं आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहे… सत्य घटना आणि काही काल्पनिक गोष्टींच्या आधारावर सिनेमाला रंजक टच देण्याचा प्रयत्न दिग्दर्शत आदित्य धर याने केला आहे. रणवीरचे ॲक्शन सीक्वेन्स आणि आर. माधवनचे दमदार डायलॉगने प्रेक्षकांना शिट्ट्या आणि टाळ्या वाजवायला भाग पाडलं आहे. पण जेव्हा उत्तर प्रदेशचा राजकारणी आणि गुंड अतीक अहमद, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, बनावट नोटांचे रॅकेट आणि नोटाबंदीच्या घोषणा पाहतात, तेव्हा सगळेच थक्क होतात. आदित्य धरने ज्या पद्धतीने आणि ज्या उद्देशाने सर्व गोष्टींचा चित्रपटाच्या कथेत समावेश केला आहे, त्यावर चर्चा आणि वादविवाद होणे निश्चित आहे.

अतीक अहमदचा काळा कारभार…

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सिनेमात अतीत अहमद याला यूपीचा पूर्व नेत्याच्या भूमिकेत दाखवलेलं नाही. पण राजकारणातील बाहुबली म्हणून त्याची भूमिका प्रेक्षकांपुढे आणली आहे. तो पांढरे कपडे घालतो, पण गोष्टी कायम एखाद्या गँगस्टर प्रमाणे करतो… फेक करंसी… ड्रग्स त्यानंतर शस्त्राचा पुरवठा… फोन कायम अतीक काळ्या कारभाराबद्दलच बोलताना दिसतो… त्यामुळे, त्याचं कनेक्श फक्त उत्तर प्रदेश आणि प्रयागराजपर्यंतच नाही, तर नेपाळमार्गे पाकिस्तान आणि दुबईपर्यंतही पसरलेलं आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकीय पटलावर त्याचा मोठा प्रभाव आहे. ही भूमिका सलीम सिद्दीकी बजावतात.

बेडवर पडलेला वृद्ध दाऊद सुद्धा रचतोय कट…

‘धुरंधर 2’ सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी ‘बडे साहब’ ची सर्वत्र चर्चा होती. आयएसआय प्रमुख मेजर इक्बालची भूमिका साकारणारा अर्जुन रामपाल, एका ‘बडे साहब’शी वारंवार फोनवर बोलताना दिसतो. रणवीर सिंगने साकारलेल्या हमजा अलीला, आयएसआय प्रमुखापेक्षाही वरचढ असलेला हा ‘बडे साहब’ नक्की कोण आहे, हेच कळत नाही. जेव्हा अर्जुन त्याची भेट घालून देतो, तेव्हा रणवीर सिंग याला कळतं की, बजे साहब म्हणजे दाऊद इब्राहिम आहे… दाऊदची भूमिका अभिनेता दानिश इक्बाल याने साकारली आहे.

सिनेमात दाऊद लाचर दाखवण्यात आला आहे. पण भारताबद्दल कट तो बेडवर असून सुद्धा रचत असल्याचं सिनेमात दाखवण्यात आलं आहे… वृद्ध झालेला आणि बेडवर पडलेला दाऊद  भारतात अशांतता कशी निर्माण करायची याबद्दल आयएसआय आणि त्याच्या हस्तकांना सतत सूचना देतो. यासाठी त्याच्याकडे दोन योजना आहेत: एक: पंजाबला अमली पदार्थांचा पुरवठा करणे, आणि दुसरी: नेपाळमार्फत बनावट चलनाचा पुरवठा करणे.

भारतात बनावट नोटा पाठवण्याचा मोठा कट

‘धुरंधर’ सिनेमाच्या पहिल्या भागात तुम्ही पाहिलं असेल, खनानी ब्रदर्सचा उल्लेख करण्यात आलाय आणि नकली नोटांचा छापखाना देखील दाखवण्यात आला आहे. तर सिनेमाच्या दुसऱ्या भागात खनानी ब्रदर्सच्या जावेज खनानी याची भूमिका वाढली… दाऊदच्या माध्यमातून त्याला भारताला हजारो कोटी रुपयांची बनावट नोटा पुरवण्याचे कंत्राट दिलं जातं. तेव्हा मुद्दा उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा दाखवण्यात आला. आयएसआय, दाऊद आणि खाननी चर्चा करतात की, उत्तर प्रदेशातील सत्तांतर रोखण्यासाठी आतिफ अहमद हे सर्वात शक्तिशाली साधन ठरू शकते. त्याला दाऊद आणि आयएसआयचा अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून सिनेमात चित्रित करण्यात आलं आहे.

नोटबंदीच्या घोषणेने पाकिस्तानी दहशतवादी पेचात

सिनेमात दाखवल्यानुसार, पाकिस्तानला पाठवलेल्या एका भारतीय गुप्तहेराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआयच्या सांगण्यावरून सीमेपलीकडील दहशतवादी सुमारे 60 हजार कोटी रुपयांच्या बनावट नोटा भारतात पाठवण्याची योजना आखत होते आणि बनावट नोटांचा पुरवठा उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकींच्या आधी करण्यास सांगण्यात आलं.

धुरंधर 2 मध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, नोटाबंदीच्या घोषणेमुळे केवळ पाकिस्तानात बनावट नोटा छापणाऱ्या जावेद खाननीलाच नव्हे, तर आयएसआय प्रमुख मेजर इक्बाल, दुबईतील दाऊद आणि भारतीय तुरुंगात असलेल्या अतीक अहमद यांनाही मोठा धक्का बसला…तेव्हाच सिनेमात एक डायलॉग आहे – भाई, हिंदुस्तान में अब हवा बदल गई है. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘धुरंधर 2’ सिनेमाची चर्चा सुरु आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?