AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 First Review: कसा आहे ‘धुरंधर २’? प्रसिद्ध दिग्दर्शकानेच सांगितला रिव्ह्यू

Dhurandhar 2 First Reveiw: गेल्या काही दिवसांपासून 'धुरंधर २' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. उद्या 19 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आज 18 मार्च पासून चित्रपटाचे पेड प्रिव्ह्यूज सुरू झाले आहेत. त्यामुळे या भागात काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dhurandhar 2 First Review: कसा आहे 'धुरंधर २'? प्रसिद्ध दिग्दर्शकानेच सांगितला रिव्ह्यू
Dhurandhar 2Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 18, 2026 | 12:18 PM
Share

बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या धुरंधर या चित्रपटाचा सिक्वल आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागातील अक्षय खन्ना, संजय दत्त, रणवीर सिंग यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर आज 18 मार्च रोजी आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाचा ‘धुरंधर २’ हा प्रदर्शित झाला आहे. १८ मार्चपासून चित्रपटाचे पेड प्रिव्ह्यूज सुरू आहेत. १९ मार्चपासून चित्रपट चित्रपटगृहामध्ये रिलीज होत आहे. चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत आणि चित्रपटाची क्रेझी अॅडव्हान्स बुकिंगवरुन दिसत आहे. दुसऱ्या भागात नेमकी कथा काय असणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचदरम्यान चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे.

कोणत्या दिग्दर्शकाने सांगितला रिव्ह्यू?

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘धुरंधर २’ पाहिला आहे आणि त्यांनी चित्रपटाचा रिव्ह्यू सांगितला आहे. राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाची खूपच प्रशंसा केली आणि आदित्य धर यांना महान दिग्दर्शक म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, हे नवीन सिनेमाई युगाचा जन्म आहे. तसेच त्यंनी चित्रपटाच नेमकं काय आहे याविषयी देखील सांगितले आहे.

कसा ‘धुरंधर २’ चित्रपट?

राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर ‘धुरंधर २’ चित्रपटाविषयी लिहिले आहे. ‘मी काल रात्री धुरंधर २ पाहिला. चित्रपटाच्या प्रत्येक पैलूत, मग ते चित्रपटाचे कलेक्शन असो, चाहत्यांचा उत्साह असो, सोशल इन्फ्लुएन्स असो, सिनेमाई व्याकरण तोडणारे असो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा सायकोलॉजिकल ऑडिओ-व्हिज्युअल प्रभाव असो, एकूणच त्याचा प्रभाव ‘शोले’ पेक्षा १०० पट जास्त शानदार असेल. आतापर्यंत बनलेल्या सर्व महान चित्रपटांपासून – मुगल-ए-आझम ते पुढे जे काही बनले, ते या चित्रपटासमोर फक्त टीव्ही मालिकेसारखे वाटतील.’

पुढे राम गोपाल वर्मा यांनी लिहिले, ‘हा एका नवीन सिनेमाई युगाचा जन्म आहे. तसेच सिनेमाच्या जुन्या जगात ज्या गोष्टी अस्तित्वात होत्या त्यांच्या समाप्तीची सुरुवात आहे. दिग्दर्शक हा शब्द आदित्य धर यांच्या नावाने सुरू होईल. स्टीवन स्पीलबर्ग आणि क्रिस्टोफर नोलन सारख्या दिग्गज फिल्ममेकर्सनाही हे समजेल की, ते सर्व काही सोडून धुरंधर २ चा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला हवा.’ राम गोपाल वर्मा यांनी रिव्ह्यू पोस्ट केल्यानंतर चाहते आणखी जास्त उत्साहित झाले आहेत. काही शहरांमध्ये चित्रपटाचे शो २४ तास चालतील. या चित्रपटात रणवीर सिंग व्यतिरिक्त संजय दत्त, सारा अर्जुन, आर माधवन आणि अर्जुन रामपाल सारखे स्टार्स आहेत. हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये आलेल्या धुरंधरचा सीक्वल आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल