‘धुरंधर 2’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहून प्रेक्षकांना बसला धक्का, पाहा काय आहे प्रकरण?

सध्या सगळीकडे धुरंधर 2 या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सीनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत ते पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

धुरंधर 2मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहून प्रेक्षकांना बसला धक्का, पाहा काय आहे प्रकरण?
Dhurandhar 2
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 19, 2026 | 3:33 PM

आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट ‘धुरंधर’ची जगभरात चर्चा पाहायला मिळाली होती. या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली होती. अक्षय खन्ना, रणवीर सिंग आणि संजय दत्तने प्रेक्षकांची मने जिंकली होती. पहिला भाग पाहिल्यानंतर सर्वांना दुसऱ्या भागाची आतुरता पाहायला मिळाली. आज या चित्रपटाचा पुढचा भाग प्रदर्शित झाला आहे. धुरंधर 2 सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. अशातच सोशल मीडियावर चित्रपटाच्या एका सीनची चर्चा रंगली आहे.

‘धुरंधर 2’ या चित्रपटातील एका सीनमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. हा सीन पाहून अनेकजण म्हणत आहेत की, चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॅमिओ आहे. अनेकांनी चित्रपटातील या सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. पण खरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चित्रपटा कॅमिओ आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

काय आहे सत्य?

‘धुरंधर 2’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतात, मात्र त्यांनी चित्रपटासाठी अभिनय केलेला नाही. चित्रपटात दिसणारी मोदींची झलक ही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर दिलेल्या त्यांच्या विजय भाषणाचे वास्तविक फुटेज आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांनी या भाषणाची क्लिप अतिशय प्रभावी पद्धतीने चित्रपटातील एका देशभक्तीपूर्ण सीनमध्ये वापरली आहे. या क्लिपमुळे तो सीन इतका प्रभावशाली आणि भावनिक झाला आहे की, प्रेक्षकांना वाटत आहे की मोदींनी स्वतः कॅमिओ दिला आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सध्या हा सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी याला ‘धुरंधर 2’ मधील सर्वात मोठे सरप्राइज आणि सर्वात प्रभावी दृश्य म्हणून संबोधले आहे. काहींनी मजेशीरपणे म्हटले की, “मोदींचा सिनेसृष्टीत डेब्यू झाला!” तर काहींनी या फुटेजचा वापर करण्याबाबत योग्य श्रेय दिले गेले का, यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिग्दर्शक आदित्य धर यांनी या छोट्याशा क्लिपद्वारे चित्रपटाला देशभक्तीचा एक शक्तिशाली टच देण्याचा प्रयत्न केला असून, तो सीन प्रेक्षकांच्या मनावर चांगली छाप सोडत असल्याचे दिसून येत आहे.

धुरंधर या चित्रपटात रणवीर सिंग व्यतिरिक्त संजय दत्त, सारा अर्जुन, आर माधवन आणि अर्जुन रामपाल सारखे स्टार्स आहेत. हा चित्रपट डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा पुढचा भाग आला आहे.

Follow Us