AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथे दीपिकाने गुड न्यूज देताच तिथे ‘धुरंधर 2’ने रचला इतिहास; साऊथ सुपरस्टारच्या चित्रपटाला टाकलं मागे

रणवीर सिंहच्या 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाला थिएटरमध्ये एक महिना पूर्ण झाला आहे. 19 मार्च 2026 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, तेव्हापासून बॉक्स ऑफिसवर त्याची दमदार कमाई सुरूच आहे. आता या चित्रपटाने साऊथ सुपरस्टारच्या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे.

इथे दीपिकाने गुड न्यूज देताच तिथे 'धुरंधर 2'ने रचला इतिहास; साऊथ सुपरस्टारच्या चित्रपटाला टाकलं मागे
Ranveer Singh and Deepika Padukone Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 20, 2026 | 10:26 AM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा 2026 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. डकैत, भूत बंगला यांसारखे इतर चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले, परंतु ‘धुरंधर 2’च्या कमाईवर त्याचा कोणताच परिणाम झाला नाही. रणवीर सिंहच्या या चित्रपटाच्या कमाईच्या वेगाला कोणीच रोखू शकलं नाही. आता प्रदर्शनाच्या एक महिन्यानंतरही हा चित्रपट कोट्यवधींचा गल्ला जमवत आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने जगभरात तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘पुष्पा 2: द रुल’लाही मागे टाकलं आहे. आता ‘धुरंधर 2’चं पुढचं लक्ष्य आमिर खानचा ‘दंगल’ असणार आहे.

‘पुष्पा 2’चा विक्रम मोडला

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने जगभरात तब्बल 1747 कोटी रुपयांची कमाई केली होती. हाच रेकॉर्ड आता ‘धुरंधर 2’ने मात्र अवघ्या एका महिन्यात मोडला आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरातील ‘धुरंधर 2’च्या कमाईचा आकडा 1778.25 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या चित्रपटाने परदेशात 452.6 कोटी रुपये कमावले आहेत. कोणत्याही हिंदी चित्रपटासाठी ही खूप मोठी बाब आहे. तर भारतातील ग्रॉस कलेक्शनचा आकडा 1335.54 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर नेट कलेक्शन 1115 कोटी रुपये इतकं झालं आहे.

‘दंगल’चा रेकॉर्ड मोडणार का?

विशेष म्हणजे आखाती देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला नसला तरी बॉक्स ऑफिसवरील कमाईवर त्याचा फारसा फरक पडलेला नाही. या चित्रपटावर पाकिस्तानमध्येही बंदी आहे. आता ‘धुरंधर 2’पुढे आमिर खानच्या ‘दंगल’चं आव्हान आहे. या चित्रपटाने जगभरात 2000 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

ओटीटीवर कधी येणार?

आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होईल, याची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. ‘धुरंधर’चा पहिला भाग जरी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला असला तरी आता दुसरा भाग त्याच ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट येत्या 14 मे रोजी जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. थिएटरमधील प्रदर्शनाला 60 दिवस पूर्ण होण्याआधीच हा ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटीवर येणार असल्याचं कळतंय. ‘स्ट्रीम जेनएक्स’वर ओटीटी प्रदर्शनाबाबत दिलेल्या माहितीला अद्याप जिओ हॉटस्टारकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नाही. ब्लॉकबस्टर बॉलिवूड चित्रपटांसाठी सर्वसाधारणपणे आठ आठवड्यांचा कालावधी पाळला जातो. त्यानंतरच तो ओटीटीवर स्ट्रीम होतो.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.