AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’च्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार स्ट्रीम?

Dhurandhar The Revenge : रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2' या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख आता समोर आली आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट व्हायरल होत आहे.

Dhurandhar 2: 'धुरंधर 2'च्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर; 'या' दिवशी होणार स्ट्रीम?
Dhurandhar The Revenge Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 15, 2026 | 3:12 PM
Share

‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास एक महिना पूर्ण होणार आहे. 19 मार्च 2026 रोजी रणवीर सिंहचा हा चित्रपट जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होईल, याची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. ‘धुरंधर’चा पहिला भाग जरी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला असला तरी आता दुसरा भाग त्याच ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही. ‘धुरंधर 2’ हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच प्रदर्शनाची तारीखसुद्धा समोर आली आहे. ‘स्ट्रीम जेनएक्स’ या इन्स्टाग्राम पेजवर ‘धुरंधर 2’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

इन्स्टा हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर 2’ हा चित्रपट येत्या 14 मे रोजी जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. थिएटरमधील प्रदर्शनाला 60 दिवस पूर्ण होण्याआधीच हा ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटीवर येणार असल्याचं कळतंय. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आपला उत्साह व्यक्त केला आहे. ‘ओटीटीवर अनकट येणार की सेन्सॉर केलेला’, असा प्रश्नही काहींनी विचारला आहे. जिओ हॉटस्टारकडून अद्याप याविषयीची कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे एखाद्या चाहत्याने ही पोस्ट एडिट करून टाकली नसावी ना, असाही अंदाज व्यक्त होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Stream GenX (@streamgenx)

‘स्ट्रीम जेनएक्स’वर ओटीटी प्रदर्शनाबाबत दिलेल्या माहितीला अद्याप जिओ हॉटस्टारकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नाही. ब्लॉकबस्टर बॉलिवूड चित्रपटांसाठी सर्वसाधारणपणे आठ आठवड्यांचा कालावधी पाळला जातो. त्यानंतरच तो ओटीटीवर स्ट्रीम होतो. यानुसार ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या ओटीटी स्ट्रीमिंगची तारीख मे 2026 च्या मध्यात असू शकते. अजूनही रणवीरचा हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कामगिरी करत असल्याने आणि आयपीएल सामन्यांमुळे स्ट्रीमिंगची तारीख जूनपर्यंतही पुढे ढकलली जाऊ शकते.

गुढीपाडवा आणि ईदच्या सुट्ट्यांचा फायदा घेत या चित्रपटाने जगभरातील ओपनिंग कलेक्शनचे सर्व विक्रम मोडले. ‘धुरंधर 2’ने शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि यशच्या ‘केजीएफ चाप्टर 2’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 674.17 कोटींची विक्रमी कमाई केली. प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशी, रविवारी 29 मार्च रोजी या चित्रपटाने 68.10 कोटी रुपयांची कमाई करत मोठं यश मिळवलं. या झेपमुळे सीक्वेलने फक्त 11 दिवसांत 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाची 840.20 कोटी रुपयांची लाइफटाइम कमाई मागे टाकली. पहिल्या चित्रपटाला हा विक्रम करण्यासाठी तीन महिन्यांहून अधिक काळ लागला होता.

Follow Us
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी.
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.