AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’ची आतापर्यंतची सर्वांत कमी कमाई; कमाईचा वेग इतका घसरला

Dhurandhar 2: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर 2: द रिव्हेंज' या स्पाय थ्रिलर चित्रपटाच्या कमाईत 18 दिवसानंतर घसरण झाली आहे. सोमवारी या चित्रपटाने सर्वसामान्य कमाई केली आहे. 'धुरंदर 2'ची ही आतापर्यंतची सर्वात कमी कमाई आहे.

Dhurandhar 2: 'धुरंधर 2'ची आतापर्यंतची सर्वांत कमी कमाई; कमाईचा वेग इतका घसरला
Dhurandhar 2Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 07, 2026 | 12:04 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. अगदी पेड प्रीव्ह्यू आणि प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने दररोज बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. परंतु आता 19 व्या दिवशी ‘धुरंधर 2’च्या कमाईला थोडा ब्रेक लागल्याचं पहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या अठराव्या दिवशी रणवीर सिंहच्या या चित्रपटाने एकूण 1013.77 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या कमाईसह हा चित्रपट भारतात अधिकृतरित्या 1000 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रूल’नंतर भारतात 1000 कोटींची कमाई करणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. तर हिंदी चित्रपट म्हणून या यादीत ‘धुरंधर 2’ पहिल्या स्थानी आहे. ‘धुरंधर 2’ची जगभरातील कमाई आता 1622.72 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. जगभरात हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा तिसरा भारतीय चित्रपट ठरला आहे.

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रदर्शनाच्या 19 व्या दिवशी ‘धुरंधर 2’च्या कमाईत बरीच घट पहायला मिळाली. या चित्रपटाने एकोणिसाव्या दिवशी फक्त 10 कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंतची ही सर्वांत कमी कमाई आहे. असं असलं तरी एकंदरीत रणवीरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

‘धुरंधर 2’ची आतापर्यंतची कमाई

आठवडा/दिवस कमाई
पहिला आठवडा 623.42 कोटी रुपये
दुसरा आठवडा 245.85 कोटी रुपये
17 वा दिवस 25.65 कोटी रुपये
18 वा दिवस 28.75 कोटी रुपये
19 वा दिवस 10.00 कोटी रुपये
एकूण कमाई 1,023.77 कोटी रुपये
वर्ल्डवाइड कलेक्शन 1,622.72 कोटी रुपये

गुढीपाडवा आणि ईदच्या सुट्ट्यांचा फायदा घेत या चित्रपटाने जगभरातील ओपनिंग कलेक्शनचे सर्व विक्रम मोडले. ‘धुरंधर 2’ने शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि यशच्या ‘केजीएफ चाप्टर 2’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 674.17 कोटींची विक्रमी कमाई केली. प्रदर्शनाच्या अकराव्या दिवशी, रविवारी 29 मार्च रोजी या चित्रपटाने 68.10 कोटी रुपयांची कमाई करत मोठं यश मिळवलं. या झेपमुळे सीक्वेलने फक्त 11 दिवसांत 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाची 840.20 कोटी रुपयांची लाइफटाइम कमाई मागे टाकली. पहिल्या चित्रपटाला हा विक्रम करण्यासाठी तीन महिन्यांहून अधिक काळ लागला होता.

Follow Us
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच, मग आता...
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवारांनी निवडणुक लढवलीच, मग आता....
जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत.....
जालना व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर; ज्वालामुखी नव्हे तर विद्युत......
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रो 9 मार्गीकेचं आज मुख्यमंत्र्यांच्या.
अशोक खरात CDR प्रकरण पेटलं; सुषमा अंधारे–अंजली दमानिया आमनेसामने
अशोक खरात CDR प्रकरण पेटलं; सुषमा अंधारे–अंजली दमानिया आमनेसामने.
बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुक
बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुक.
हिगोलीत शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आले
हिगोलीत शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आले.
अशोक खरात प्रकरण तापलं; सुषमा अंधारेंची CID चौकशीची मागणी
अशोक खरात प्रकरण तापलं; सुषमा अंधारेंची CID चौकशीची मागणी.
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर फुल्या कोणी मारल्या? - सुषमा अंधारे
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर फुल्या कोणी मारल्या? - सुषमा अंधारे.
अजितदादांच्या अपघाताच्या आदल्यादिवशी भोंदू खरातला 17 मेसेज कुणाचे?
अजितदादांच्या अपघाताच्या आदल्यादिवशी भोंदू खरातला 17 मेसेज कुणाचे?.
मोठी खळबळ! दिल्ली विधानसभा परिसरात अज्ञात कार थेट आत घुसली अन्...
मोठी खळबळ! दिल्ली विधानसभा परिसरात अज्ञात कार थेट आत घुसली अन्....