tv9 Marathi Special Report | अशोक खरात CDR प्रकरण पेटलं; सुषमा अंधारे–अंजली दमानिया आमनेसामने, आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं
अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला असून, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) संदर्भातील आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर शंका उपस्थित केल्यानंतर हा वाद अधिकच तीव्र झाला. भोंदूगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात याचा पर्दाफाश करणाऱ्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली.
अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला असून, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) संदर्भातील आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर शंका उपस्थित केल्यानंतर हा वाद अधिकच तीव्र झाला. भोंदूगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात याचा पर्दाफाश करणाऱ्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, या परिषदेदरम्यान त्यांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. अंधारे यांनी दमानिया यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत, CDR मधील मुख्यमंत्र्यांच्या विरोधातल्या लॉबीतील नेत्यांनीच नावं घेतली असा आरोप अंधारेंनी केला.
दमानिया यांनी त्यांच्या खुलाशात अशोक खरात यांच्यासोबत विविध राजकीय नेत्यांचे संपर्क असल्याचा दावा केला. यामध्ये रुपाली चाकणकर यांचे 117 कॉल्स, एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल्स तसेच चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांच्याशी झालेल्या संपर्काचा उल्लेख त्यांनी केला. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी CDR बाहेर काढण्याच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित करत, अशी माहिती उघड करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. मात्र, त्याच वेळी या माहितीतील मुद्दे दुर्लक्षित करता येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे अंधारे आणि दमानिया यांच्यातील वाद अधिकच चिघळल्याचे चित्र असून, आगामी काळात यावर आणखी राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Apr 07, 2026 10:48 AM
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

