AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 तासांपर्यंत मी एकदाही..; ‘धुरंधर 2’ पाहिल्यानंतर विराट कोहलीची पोस्ट, रणवीरबद्दल म्हणाला..

Virat Kohli On Dhurandhar 2: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 1600 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता विराट कोहलीनेही या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

4 तासांपर्यंत मी एकदाही..; 'धुरंधर 2' पाहिल्यानंतर विराट कोहलीची पोस्ट, रणवीरबद्दल म्हणाला..
Virat Kohli on Dhurandhar 2Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 07, 2026 | 8:47 AM
Share

Virat Kohli On Dhurandhar 2: अभिनेता रणवीर सिंहने ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर मोठा इतिहास रचला आहे. 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. थिएटर्सपासून सोशल मीडियापर्यंत ‘धुरंधर 2’ची क्रेझ पहायला मिळतेय. बॉलिवूड, टॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यातच आता क्रिकेटर विराट कोहलीची भर पडली आहे. रणवीरच्या या चित्रपटाने किंग कोहलीचंही मन जिंकलं आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये त्याने या चित्रपटासाठी खास पोस्ट लिहिली आहे. विराट कोहलीने ‘धुरंधर 2’ हा चित्रपट पाहिला आणि हा एकंदर दमदार सिनेमॅटिक अनुभव असल्याचं त्याने म्हटलंय.

काय म्हणाला विराट?

‘आज मी हा चित्रपट पाहिला आणि मी हे सांगू शकतो की भारतात मला असा सिनेमॅटिक अनुभव पहिल्यांदाच आला आहे. या चित्रपटाने माझ्या मनातील प्रत्येक भावना जागृत केली आणि जवळपास चार तास मी क्षणभरही जागेवरून हललो नाही’, अशा शब्दांत विराटने त्याचा अनुभव सांगितला. या पोस्टमध्ये पुढे दिग्दर्शक आदित्य धरचा उल्लेख करत विराटने लिहिलं, ‘तुम्ही जे काही निर्माण केलं आहे, त्यात तुमची प्रतिभा स्पष्ट दिसून येते. तुम्हाला खरंच सलाम! तुम्ही अत्यंत प्रतिभावान व्यक्ती आहात.’

विराटने अभिनेता रणवीर सिंहचंही कौतुक केलं आहे. ‘चित्रपटातील सर्वच कलाकार आपापल्या भूमिकेत चांगले दिसले, पण रणवीर.. या चित्रपटानंतर तू एका वेगळ्याच पातळीवर पोहोचला आहेस आणि तुझा अभिनय अत्यंत उच्च दर्जाचा आहे. खरोखरंच अप्रतिम’, असं त्याने म्हटलंय.

विराटसोबतच त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही ‘धुरंधर 2’वर प्रतिक्रिया दिली आहे. तिलाही रणवीरचा हा चित्रपट खूप आवडला आहे. अनुष्काने रणवीरसोबतच राकेश बेदी आणि आर. माधवन यांसारख्या कलाकारांची प्रशंसा केली. या चित्रपटाच्या प्रचंड यशाबद्दल अनुष्काने सर्व कलाकारांचं अभिनंदन केलं.

‘आदित्य धर.. काय जबरदस्त चित्रपट तू बनवला आहेस. चार तासांचा असा चित्रपट बनवण्यासाठी प्रचंड दृढ विश्वास हवा असतो. संपूर्ण चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतो. अत्यंत विचारपूर्वक प्रत्येक रचना केली आहे. तू खरंच ओरिजिनल आणि विश्वासू दिग्दर्शक आहे. रणवीर सिंहने तर त्याच्या करिअरमधील सर्वांत जबरदस्त भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेत कोणतीच चूक काढता येणार नाही. आर. माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी सर आणि इतर प्रत्येक कलाकाराने चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे’, अशी पोस्ट अनुष्काने लिहिली आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...