श्रीदेवी म्हणजे लोकांचा संसार उद्ध्वस्त करणारी बाई… आईवर लागलेल्या डागावर जान्हवी असं काय म्हणाली?
श्रीदेवी म्हणजे लोकांचा संसार उद्ध्वस्त करणारी बाई..., आईच्या पडत्याकाळाबद्दल जान्हवी कपूरने अनेक वर्षांनंतर सोडलं मौन... म्हणाली..., सर्वत्र चर्चांना उधाण..., यावेळी जान्हवीने केलेत मोठे खुलासे

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत. एवढंच नाही तर, दिवंगत आई श्रीदेवी यांच्या कठीण प्रवासाबद्दल देखील जान्हवी हिने सांगितलं आहे… श्रीदेवी यांनी 2018 मध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाला अनेक वर्ष झालीत, पण आईच्या निधनाच्या वेदना त्यांच्या मुलींच्या मना आजही ताज्या आहे… आईला गमावल्यानंतर आयुष्यात आलेला एकटेपणा… आजही त्यांच्या मुलींच्या आयुष्यातील पडती बाजू आहे… श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवी आणि खुशी यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे.
आईच्या निधनानंतर काही लोकांनी घेतला फायदा…
नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये जान्हवी कपूर म्हणाली, ‘आईच्या निधनानंतर एका रात्रीत मोठं आणि समजदार व्हावं लागलं. आधी प्रत्येक गोष्टीसाठी आईवर अवलंबून होते. कोणते कपडे घालायचे आहेत, काय बरोबर आहे आणि काय चुकीच आहे… सर्वकाही आई ठरवत होती… पण आईच्या निधनानंतर सर्वत्र काही स्वतःचं स्वतःला करावं लागलं आणि तेव्हा आमच्या कुटुंबाबद्दल देखील नकोत्या चर्चा झाल्या. आमच्या पडत्या काळात काही लोकांना आम्ही आमच्या आयुष्यात जागा दिली, पण त्यांनीच आमचा फायदा घेतला… ‘
वडिलांना देखील गमावलं…
जान्हवी म्हणाली, ‘आईच्या जाण्यानंतर असं वाटलं फक्त आईलाच नाही तर, वडिलांना देखील गमावलं आहे…कारण आईसोबत त्यांची जी वागणूक होती, ती बदलली होती. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य… आईसोबत संवाद…आज जर आईला काही सांगायचं असेल तर, एकच गोष्ट सांगेल आणि ती म्हणजे, ती काय बोलत होती, ते मला आता कळत आहे… या गोष्टीचा पश्चाताप राहिल की, पूर्वी असं करु शकली नाही…’
श्रीदेवी म्हणजे लोकांचं संसार उद्ध्वस्त करणारी महिला…
जान्हवी म्हणाली, ‘आईने प्रचंड संघर्ष केला आहे… करियरच्या सुरुवातीला त्यांनी अनेक चांगल्या – वाईट गोष्टींचा सामना केला. पण तेव्हा लोकांनी त्यांच्यासोबत चांगलं वर्तन केलं नाही… लोकांचं संसार उद्ध्वस्त करणारी महिला असं देखील माझ्या आईला म्हणण्यात आलं. पण त्यांनी कधीच आम्हाला त्यांच्या आयुष्यातील वाईट दिवसांबद्दल सांगितलं नाही…’
सांगायचं झालं तर, बोनी कपूर यांचं पहिलं लग्न मोना कपूर यांच्यासोबत झालेलं. त्यांना दोन मुलं देखील आहेत. अर्जुन आणि अंशुला… असं असताना देखील बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं आणि जान्हवी आणि खुशी यांना जन्म दिला.
