AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईचा सलग चौथा पराभव, पलटणच्या स्थितीला चौघे सर्वाधिक जबाबदार

Mumbai Indians ipl 2026 : मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्स विरुद्ध आपल्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा हा सलग आणि एकूण चौथा पराभव ठरला.

IPL 2026 : 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईचा सलग चौथा पराभव, पलटणच्या स्थितीला चौघे सर्वाधिक जबाबदार
Hardik Pandya Mumbai Indians IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 17, 2026 | 3:54 AM
Share

मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सकडून 16 एप्रिलला 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. पंजाबने मुंबई विरुद्ध 196 धावांचं आव्हान हे 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. कॅप्टन श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन या दोघांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने मुंबई विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये सहज आणि सोपा विजय मिळवला. पंजाबचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. यासह पंजाब किंग्स वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणारी पहिली टीम ठरली. पंजाबचा 16 एप्रिल रोजीचा वानखेडेतील मुंबई विरुद्धचा एकूण सहावा विजय ठरला. तसेच मुंबईचा 19 व्या मोसमातील एकूण चौथा पराभव ठरला. मुंबईच्या या स्थितीला कोणते 4 खेळाडू हे जबाबदार आहेत? याबाबत जाणून घेऊयात.

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह मुंबईचा प्रमुख आणि सध्याचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. बुमराहने मुंबईला आतापर्यंत अनेक सामन्यांत एकहाती विजय मिळवून दिला आहे. बुमराहने अनेकदा अशक्य वाटणाऱ्या सामन्यात विजयी केलं आहे. मात्र बुमहारची सलग आणि एकूण 5 विजयानंतरही विकेटची पाटी कोरीच आहे. त्यामुळे बुमराहचा तो दबदबा नाहीसा झालाय की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

बुमराहने या मोसमात आतापर्यंत एकूण 5 सामन्यांमध्ये 164 धावा लुटवल्या आहेत. मात्र बुमराहला एकही विकेट मिळवता आलेली नाही. बुमराहचा या मोसमातील इकॉनमी रेट हा 8.63 असा आहे. बुमराहची ही कामगिरी मुंबईच्या अपयशासाठी कुठेतरी कारणीभूत आहे.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव टी 20I टीम इंडियाचा कॅप्टन आहे. सूर्याचा टीम इंडियाप्रमाणे मुंबई इंडियन्सकडून खेळतानाही धावांसाठीचा संघर्ष सुरुच आहे. सूर्याने आतापर्यंत एकूण 5 सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह एकूण 106 रन्स केल्या आहेत. बुमराहच्या या एका अर्धशतकाचा अपवाद वगळता त्याला धावांसाठी झगडावं लागत आहे.

तिलक वर्मा

तिलक वर्मा याची सूर्यकुमार यादव याच्यापेक्षा वाईट स्थिती आहे. तिलकला या मोसमात 5 पैकी 2 डावांत दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. तिलक एका सामन्यात झिरोवर आऊट झालाय. तिलकने या 5 सामन्यांमध्ये एकूण 43 धावा केल्या आहे.

हार्दिक पंड्या

मुंबईच्या या स्थितीला प्रमुख म्हणून हार्दिक पंड्या सर्वाधिक जबाबदार आहे. हार्दिकला नेतृत्वासह फलंदाजी आणि गोलंदाजीनेही काही खास करता आलेलं नाही. हार्दिकने 4 सामन्यांत 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 81 रन्स केल्या आहेत. त्यामुळे मुंबईला कमबॅक करायचं असेल तर कॅप्टन आणि हार्दिकसह वरील तिघांना दमदार कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...