AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1100 कोटी कमावूनही ‘धुरंधर’चा कोट्यवधींचा तोटा; वितरकाने सांगितलं कारण

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. प्रदर्शनाच्या वीस दिवसांनंतरही चित्रपटाची जोरदार कमाई सुरू आहे. असं असूनही या चित्रपटाला कोट्यवधींचा तोटाही सहन करावा लागला आहे.

1100 कोटी कमावूनही 'धुरंधर'चा कोट्यवधींचा तोटा; वितरकाने सांगितलं कारण
DhurandharImage Credit source: instagram
| Updated on: Dec 31, 2025 | 2:38 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 2025 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने जगभरात 1100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. जगभरात सुरू असलेल्या ख्रिसमसच्या सुट्ट्यांचाही या चित्रपटाच्या कमाईला चांगला फायदा झाला आहे. याच कारणामुळे या चित्रपटाने परदेशात 26 दशलक्ष डॉलरचा आकडा पार केला आहे. असं असलं तरी या चित्रपटाला मोठा तोटाही सहन करावा लागला आहे. यामागचं कारण चित्रपटाच्या वितरकांनी स्पष्ट केलं आहे.

‘सीएनएन न्यूज 18’शी बोलताना ‘धुरंधर’चे वितरक प्रणव कपाडिया यांनी सांगितलं की काही देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घातल्याने काही प्रमाणात नुकसान झेलावं लागलं आहे. “माझ्या मते जवळपास 90 कोटी रुपयांचा तोटा झाला असेल. कारण अॅक्शन चित्रपटांना मिडल ईस्टमध्ये प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे धुरंधर तिथे प्रदर्शित झाला असता तर कोट्यवधींची कमाई झाली असती. त्यामुळे तिथे हा चित्रपट प्रदर्शित करावा असं आम्हाला वाटतं. पण त्याचसोबत आपल्याला त्या देशाच्या विचारांचा, नियमांचाही आदर करावा लागतो. त्यांची स्वत:ची काही कारणं असतात. मिडल ईस्टमध्ये धुरंधर, फायटर यांसारखे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. पण आखाती देशांमधून नसलं तरी इतर देशांमध्ये आमच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला”, असं ते पुढे म्हणाले.

डिसेंबरच्या सुट्ट्यांमुळे हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाल्याचंही त्यांनी सांगितलं. “या सिझनमध्ये लोक परदेशात प्रवास करतात. मध्य पूर्वेपासून युरोप आणि अमेरिकेपर्यंत लोक सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी जातात. डिसेंबरच्या सुट्टीच्या सिझनमध्ये धुरंधर प्रदर्शित झाल्याने प्रवासी प्रेक्षकांनाही हा चित्रपट पाहण्यासाठी वेळ मिळाला”, असं त्यांनी नमूद केलं. धुरंधर हा चित्रपट पाकिस्तान, बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरब आणि युएईमध्ये प्रदर्शित झाला नाही.

या चित्रपटात रणवीरने हमजाची भूमिका साकारली आहे. जो कराचीतील दहशतवादी टोळ्या आणि नेटवर्कमध्ये घुसखोरी करणारा भारतीय गुप्तहेर असतो. या स्पाय थ्रिलरमध्ये अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन यांच्याही भूमिका आहेत. मार्च 2026 मध्ये ‘धुरंधर’चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट
मुंबई अन् ठाणे महापालिकेत चौरंगी लढत, 29 पैकी 18 ठिकाणी महायुतीत फाईट.
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप
उमेदवारीसाठी दादांकडे 5, शिंदेंकडे 10 कोटी घेतात, राऊतांचा गंभीर आरोप.
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल
मुंबईत उत्तर भारतीय महापौर! BJPच्या बड्या नेत्यानं ठाकरे बंधूंना डिवचल.
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने.
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर.
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन..
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन...